दिनेश गुळवे , बीडगेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. उन्हाळ्यात धो-धो कोसळलेल्या पाऊसाने आता पावसाळ्यात दडी मारल्याने तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना टॅँकरने पाणीपुरठा केला जात आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात कधीनव्हे ती जिल्ह्यात प्रचंड गारपीट झाली. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने धरणाची पातळीही प्रथमत:च वाढली होती. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून आलेला पाऊस आता मात्र जून महिना संपला तरी जिल्हावासीयांवर रुसलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३ लाख २७ हजार ५३९ नागरिकांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी शासकीय १९ व खाजगी १६५ टॅँकरचा वापर केला जात आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ आष्टी तालुक्याला सोसावी लागत आहे. या तालुक्यातील १ लाख ७७ नागरिकांसाठी दररोज टॅँकरच्या २२० खेपा केल्या जात आहेत. यासह गेवराई, बीड, शिरूर, पाटोदा, केज व धारूर तालुक्यातही काही ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरसह १८० गावे व १७१ वाड्यांसाठी १३८ विहिरी व २९० बोअरचे अधिग्रहण केले आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी विकत मिळणेही दुरापस्त झाले आहे. यातच जून संपला तरीही पावसाने पाठ फिरविल्याने अनेकांनी स्थलांतर केले आहे. तर, पाऊस पडला नसल्याने प्रशासनही गंभीर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांमध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. गतवर्षी १ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शंभरपेक्षा अधिक मि. मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र अद्याप एकाही तालुक्यात पावसाची सरासरी ४५ चा आकडाही ओलांडू शकली नाही. गेल्या दोन दिवसांपासून काहीसे वातावरण बदललेले आहे. सायंकाळी वातावरण ढगाळ असते, मात्र पाऊस दररोज हुलकावणी देत आहे. त्यामुळे ही दुष्काळाची तर चिन्ह नाहीत ना? याची चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.सर्वांना मुबलक पाणीपुरवठा करूजिल्ह्यात अद्यापही पाऊस नसला पडल्याने अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, पाणीटंचाईच्या कालावधीत वाढ करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनीही पाणीपुरवठ्यासाठी काही नवीन योजना असतील तर सूचवाव्यात. तसेच ज्या योजनांचे काम राहिलेले आहे, तेही पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. एकंदरच उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन केले आहे.नागरिकांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापुढेही ग्रामीण भागात मुबलक पाणी पुरवठा केला जाईल, मागणी आहे तेथे टॅँकर सुरू केले जात असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. (भाग -१ )तालुका टॅँकरने १ जून २०१४ १ जून २०१३पाणीपुरवठा पर्यंत पाऊस पर्यंत पाऊस(लोकसंख्या) बीड ७५९९३ ३४.० १४३.८गेवराई २१९८६ २७.३ १३६.६वडवणी ०० ३६.५ २०८.०शिरूर २६२०० २८.० ११०.१पाटोदा १४३११ ४२.३ १७४.२आष्टी १०००७७ ३४.१ ९३.१अंबाजोगाई ०० ५२.० १२६.१केज ७५७४८ १३.० १२२.०परळी १५०० ४४.८ १२६.८धारूर ११७२४ १०.६ १०४.९माजलगाव ०० ३१.० १२५.१
पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ
By admin | Published: July 01, 2014 11:15 PM