छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेचा शहराला त्वरित फायदा कसा मिळेल यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे कामाला लागली आहेत. ११ जलकुंभांचे काम पूर्णत्वाकडे असून, त्यातील ०४ जलकुंभ दिवाळीपूर्वी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येतील. वर्षाखेरीस उर्वरित ०७ जलकुंभ दिले जातील. यामुळे ०३ लाखांहून अधिक नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू आहे. हे काम जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. मार्चपूर्वी शहरात अतिरिक्त ८० एमएलडी पाणी आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
काय फायदा होणारशहराला एक दिवसाआड पाणी येणार८० एमएलडी पाणी अतिरिक्त मिळणार
येणारा उन्हाळयात दिलासादरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड ओरड होते. येणारा उन्हाळा शहरवासीयांना दिलासा देणारा ठरेल असे संकेत मिळत आहेत. २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील ५४ पैकी ११ जलकुंभ पूर्ण होत आले. काही जलकुंभांची तपासणीसुद्धा सुरू करण्यात आली.
पूर्वीच्या तुलनेत काम गतीने सुरूनियोजित वेळापत्रकानुसार सर्व कामे होतील असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत मनपाला मिळणार यादृष्टीने काम सुरू आहे. जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारण्यासाठी मुजरांची संख्याही वाढविली. पूर्वीच्या तुलनेत काम गतीने सुरू आहे. सोबतच जायकवाडीत कॉफर डॅमची उंचीही वाढविली जात आहे.-आर. एस. लोलापोड, मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
कोणते चार जलकुंभ अगोदर मिळणार?जलकुंभ- क्षमता- हस्तांतरण तारीख- लोकसंख्याहनुमान टेकडी- २१.३५ लाख लिटर्स- ३१.०८.२३- २२,९२८टीव्ही सेंटर- १६.५५-----------३१.०८.२३- २१,८८२हिमायत बाग- ३७.०९---------३०.०९.२३-४१, २५०दिल्लीगेट- ३०.०७-----------३१.१०.२३-४३,३५२
दुसऱ्या टप्प्यात ०७ जलकुंभ मिळणारजलकुंभ- क्षमता- लोकसंख्याप्रतापनगर - ७.९५ लाख लिटर्स- - १०,०४७शाक्यनगर- २६.०५---------२७,७११मिसरवाडी-गरवारे-१९.०३-----१७,१९८शिवाजीनगर एन-२- ३४.६५----५०,६५०ज्युबली पार्क- १६.९५----------२३,८७०पारिजातनगर- ११.४५---------१५,५०९किटली गार्डन- २४.१५---------२५,१३८