शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

पाणीटंचाई कृती आराखडा कागदावरच

By admin | Published: May 30, 2014 11:58 PM

सुनील चौरे, हदगाव तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख १० हजारांचा करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता़

सुनील चौरे, हदगाव तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख १० हजारांचा करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता़ त्यापैकी २९ लाख रुपये निधी मंजूरही झाला असला तरी अद्याप एकाही गावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही़ अनेक गावे पाणीटंचाईच्या खाईत असतानाही प्रशासन मात्र पाणीटंचाई नसल्याचे कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहे़ ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ पाणीटंचाई कृती आराखडा दोन टप्प्यात करण्यात येतो़ जानेवारी ते मार्च पहिला टप्पा तर दुसरा टप्पा एप्रिल ते जून असा असतो़ परंतु सध्या मे महिना संपत आला आहे. एकाही गावात सार्वजनिक विहीर नाही़ हातपंप दुरूस्ती नाही़ नवीन हातपंप सुरू केले नाहीत़ पुरक नळयोजना सुरू नाहीत़ यावर्षी पावसाळा चांगला झाला़ त्यामुळे पाणीटंचाई अनेक गावांत नाही़ तालुक्यात कुठेच पाणीटंचाई नाही, तर मग ६५ लाखांचा कृती आराखडा कशासाठी केला? हाही एक प्रश्नच आहे़ नळयोजना विशेष दुरूस्तीसाठी तळणी, मनुला खुर्द, हरडफ, लोहातांडा, आष्टीतांडा, धोतरा, पाथरड, कोळगाव, चिकाळा, पिंपळगाव, कनकेवाडी, माळझरा, बरडशेवाळा या १४ गावांचा समावेश होता़ दुसर्‍या टप्प्यात एप्रिल ते जून नळयोजना विशेष दुरूस्ती पिंपळगाव ४, साप्ती १ येथे होत्या़ नवीन विहीर २४ ठिकाणी अभिप्रेत होत्या़ यामध्ये यळंब, गोर्लेगाव, कोथळा, बाभळी, हाडसणी, बेलमंडळ, गोरफळी २, वायफना १, जगापूर १, कोळी १, शिबदरा २, निमगाव १, चोरंबा (ना), १, खैरगाव १, रोडगी १, बामणी तांडा १, कवाना १, डोरली १, टाकळगाव १, डोंगरगाव १ परंतु एकाही ठिकाणी काम सुरू नाही़ याविषयी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ए़ आऱ वडजे यांना विचारपूस केली असता आमच्याकडे मागणी आली नाही़ आमच्या तालुक्यात नजरेत पाणीटंचाई नाही़ १४ गावांत हातपंपासाठी परवानगी मिळाली़ कामाला लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले़ या १४ गावांमध्ये जांभळसावली, शिबदरा, बोरी, हस्तरा, गुरफळी, गोर्लेागाव, अंबाळा, डिग्रस, राळावाडी, ठाकरवाडी, राजवाडी, येवली, वायफना (खु़), आष्टी, लिंगापूर, धानोरा आदी गावांचा समावेश आहे़ पावसाळा चांगला झाला असला तरी अनेक गावांतील काही भागात भीषण पाणीटंचाई आहे़ नियोजनाअभावी तर काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे टंचाई आहे़ मनाठा, सावरगाव, बरडशेवाळा, चिंचगव्हाण, निवघा, तामसा आदी ठिकाणी टंचाई आहे़ ग्रामपंचायतने लक्ष घालून प्रस्ताव पंचायत समितीला पाठविणे आवश्यक आहे़ वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्या गावाला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करूनही पाणीटंचाई निवारण करणे गरजेचे आहे़ परंतु असे होताना दिसून येत नाही़ पाऊस समाधानकारक होईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे़ नवीन विंधन विहिरीसाठी ४२ गावांचा समावेश होता़ यामध्ये तळणी २, उंचेगाव (बु़) १, आमगव्हाण-१, इरापूर १, वाकी १, अंबाळा २, हस्तरा १, बोरगाव १, धानोरा १, भानेगाव १, रूई १, तामसा २, दिग्रस १, हळेगाव १, वारकवाडी २, हळेगाव १, आष्टी १, वाळकी खु़ १, धानोरा १, तळेगाव २, लिंगापूर १, घोगरी २, येवली १, राजवाडी १, तालंग १, करमोडी १, नेवरी १, मरडगा १, चाभरा २, वरवट १, पळसा १, गारगव्हाण १, बामणी २, केदारगुडा १, ल्याहरी १ इत्यादी गावांना ठेंगाच दाखविण्यात आला़ टँकरद्वारे पाणीपुरवठा पहिल्या टप्प्यात २, तामसा २, शेतमजूरवाडी १, मनाठा २ आदी गावांचा समावेश होता़