शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

औरंगाबादकरांवर जलसंकट; आता मिळणार सात दिवसांआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:18 PM

एक्स्प्रेस जलवाहिनीकडे मनपा आयुक्त फिरकलेच नाहीत

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक सध्या पाणी प्रश्नाला जाम कंटाळले आहेत. पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून महापालिकेने दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला. आता तर पालिकेने हद्दच केली आहे. अघोषित नियमानुसार चक्क सात दिवसांआड शहरातील विविध वसाहतींना पाणीपुरवठा होत आहे. एवढ्यावरही महापालिका प्रशासन पाणी प्रश्न गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही. शहरात येणाऱ्या पाण्यात कशी वाढ होईल, याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सिडको-हडकोतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. त्यांनी जलवाहिनीकडे दिवसभरात ढुंकूनही पाहिले नाही.

मागील एक महिन्यापासून शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एन-५, एन-७ पाण्याच्या टाकीवर दररोज नागरिक आंदोलन करीत आहेत. मनपा मुख्यालयासमोरही विविध वसाहतींमधील नागरिक येऊन आंदोलन करीत आहेत. मनपा प्रशासन कोणत्याच उपाययोजना करण्यास तयार नाही. पूर्वी शहरात दोन दिवसांआड पाणी देण्यात येत होते. पाणी कमी पडू लागले म्हणून मनपाने तीन दिवसांआडचा निर्णय घेतला. यालाही नागरिकांनी मूक संमती दिली. आता महापालिका प्रशासनाने कहरच केला. अघोषितपणे शहरातील बहुतांश वसाहतींना सहा, सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. अनेक नागरिकांकडे आठ दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच नाही.

वीज वितरण कंपनीचे शटडाऊनसिडको-हडको भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाच शुक्रवारी वीज वितरण कंपनीने तब्बल अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे तब्बल सातव्या दिवशीदेखील पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री उशिरा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. सिडको एन-५ भागातील आविष्कार कॉलनीसह इतर ठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठ्याचा वेळ होता. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. मात्र एकाने महापालिकेच्या पाईपलाईनवरच बोअर घेतल्याचा प्रकार समोर आला. या बोअरमुळे पाणी पुढच्या भागाला पोहोचलेच नाही. दरम्यान पाणीपुरवठा बंद करून पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी पाणी येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी ११ ते १.३० असा अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे या भागाला पाणी मिळू शकले नाही. रात्री उशिरा पाणी दिले जाईल, असे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले.  

सिडको-हडकोकडे दुर्लक्षशहरातील ४० पेक्षा अधिक वॉर्डांना एन-५, एन-७ येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा होतो. येथे पाणीच कमी येत आहे. त्यामुळे शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौरांच्या सूचनेवरून नक्षत्रवाडी ते एन-५ पाण्याच्या टाकीपर्यंत एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. दुपारी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर आयुक्त आले आणि तिसऱ्या मिनिटाला निघूनही गेले.

कोणत्या भागात पाणी कधी

जयभवानीनगर - सहा दिवसांनंतरशिवाजीनगर- चार दिवसांनंतरब्रिजवाडी- सात दिवसांनंतरनारेगाव- सात दिवसांनंतरपॉवरलूम- सात दिवसांनंतररवींद्रनगर- चार दिवसांनंतरमछली खडक- सात दिवसांनंतरएस. टी. कॉलनी, मुकुंदवाडी- पाच दिवसांनंतरबेगमपुरा- आठ दिवसांनंतरगजाननगर-पुंडलिकनगर- चार दिवसांनंतरआरेफ कॉलनी- सात दिवसांनंतरसाईनगर-एन-६- पाच दिवसांनंतरगजानन कॉलनी- चार दिवसांनंतररामनगर, मुकुंदवाडी- सात दिवसांनंतर 

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाstate transportएसटी