शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
3
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
4
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी
5
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
6
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
7
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
8
अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल
9
पालकांनो, मुलांना सांगताय... पण तुम्ही स्वतः काय करता आहात? कुटुंबासाठी मोबाईल असा ठरतोय घातक
10
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
11
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
12
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
13
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
14
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
15
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
16
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
17
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
18
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
19
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
20
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

मराठवाड्यात पाणीटंचाई; तीन जिल्ह्यांना ८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:59 IST

टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांत टँकर सुरू करण्याचे नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील ५७ गावे व ११ वाड्यांना ८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांत टँकर सुरू करण्याचे नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ८ गावे व ५ वाड्यांना १२ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यात फुलंब्रीतील १ गावात २ टँकर, पैठण तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे, वैजापूर तालुक्यातील १५ गावे व एका वाडीला १६ टॅंकरद्वारे तर गंगापूर तालुक्यातील तहानलेल्या ७ गावांना १० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ४२ गावे व ६ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरच्या मंजूर फेऱ्यांची संख्या १०१ आहे. ५६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एक व माहूर येथील एका गावाला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जालना जिल्ह्यातील १३ गावे व ५ वाड्यांना मिळून ३० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात जालना तालुक्यातील ३ गावे व २ वाड्यांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील ६ गावे व ३ वाड्यांना १२ टँकरने, अंबड तालुक्यातील ४ गावांना ६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMarathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर