औरंगाबाद: गोदावरी नदीचे धरणाखालील पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे हिरडपुरी बंधा-यात पाणी सोडण्यात यावे. जेणेकरून शेतक-यांचे रबी हंगामातील पिके वाचतील. अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील १५ दिवसांपूर्वी या मागणीसाठी सुमारे ५०० हून अधिक शेतकºयांनी या मागणीसाठी आयुक्तांची भेट घेतली होती. परंतु त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र देऊन मागणी करण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:41 IST