शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

औरंगाबाद महापालिकेकडून वर्षभरात अवघे ५० दिवसच झाला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:09 AM

महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.

औरंगाबाद : महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.पाणी टंचाईला कंटाळलेल्या औरंगाबादकरांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांचा चांगलाच घाम फोडला. त्यामुळे पाणीपट्टीचे दर किमान ३ हजार रुपयांपर्यंत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. येणाºया सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासनाकडून दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

केंद्र, राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनीसाठी निधी दिला. या निधीवर व्याजच १२५ कोटी रुपये जमा झाले आहे. मात्र आजपर्यंत महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकता आली नाही. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक प्रभागांना आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी मागील दोन महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने एन-५, एन-७ येथील जलकुंभावर झाले आहेत. शहराच्या आसपास असलेल्या तब्बल २०० वसाहतींना आजपर्यंत महापालिकेने जलवाहिनी टाकून दिलेली नाही. आजही या वसाहती टँकरवर दिवस काढत आहेत. मनपाकडे आगावू पैसे भरूनही टँकरद्वारे वेळेवर पाणी मिळत नाही. एकीकडे पाण्यासाठी शहरात प्रचंड ओरड सुरू असताना जायकवाडी जलाशयातील पाणी पातळीही खालावली आहे. मृतसाठ्यातून सध्या शहराची तहान भागवावी लागत आहे. शहरात येणाºया पाण्यात किमान २० टक्के घट झाली आहे.

पाणी प्रश्नावर लोकसभा निवडणूक कशीबशी पार पडली. विधानसभा निवडणुकीत मतदारराजा सोडणार नाही, असे सत्ताधाºयांना वाटू लागले आहे. पुढील वर्षी ऐन उन्हाळ्यातच मनपाची निवडणूक आहे. त्यामुळे सहा महिन्यांत समांतरचे नारळ फोडण्यासाठी युती सरसावली आहे. पाणीपट्टीचे दर कमी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचेही पाणीपट्टी कमी करण्यावर एकमत झाले आहे.

पत्नीने वाढविले होते दर२०१२मध्ये विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी १८०० रुपयांवरून पाणीपट्टीचे दर २५०० रुपये केले होते. त्यानंतर समांतर जलवाहिनीसाठी दरवर्षी १० टक्के दरवाढीचा निर्णयही अनिता घोडेले यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. सात वर्षांनंतर पुन्हा पाणीपट्टीचे दर कमी करण्याचे दायित्व अनिता घोडेले यांचे पती नंदकुमार घोडेले यांच्यावर येऊन ठेपले आहे.येणाºया सर्वसाधारण सभेत दर आणखी कमी करण्यासाठी चर्चा होईल. नगरसेवक ठरवतील तेवढे दर ठेवण्यात येतील. साधारणपणे ३ हजार रुपयांच्या आसपास दर राहतील, असे वाटत आहे.- नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद