औरंगाबाद : पुंडलिकनगर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी विस्कळीत झाला. ज्या वसाहतींना मंगळवारी पाणीपुरवठा होणार होता, त्यांना बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे, तर बुधवारचा पाणीपुरवठा गुरुवारी होणार आहे. काही भागांना सहाव्या तर काही भागांना सातव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे.
ड्रेनेज दुरुस्तीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष
औरंगाबाद : जयभवानीनगर परिसरातील ड्रेनेज दुरुस्तीकडे मनपा वॉर्ड कार्यालयाच्या यंत्रणेने दुर्लक्ष केल्याची ओरड नागरिक करीत आहेत. ड्रेनेजवरील ढापे देखील फुटले असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सरकारी कार्यालयात गर्दी कमी
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काही विभागात तुरळक गर्दी दिसून येत आहे. इतर कार्यालयांत नागरिकांचे येणे बंद असल्यासारखे आहे.
एमजीएम परिसरातील रस्ता उखडला
औरंगाबाद : एमजीएममधून एन-१ कडे येणारा रस्ता खराब झाला आहे. सदरील रस्त्याचे मजबुतीकरण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महालक्ष्मी मंदिराच्या बाजूने येणाऱ्या त्या रस्त्यावरून जड वाहने देखील जात आहेत. सदरील रस्ता तातडीने बांधावा, अशी मागणी होत आहे.