जायकवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणा पाईपलाईनला पशुवैद्यकीय दवाखाना ते न्यायालय या दरम्यान मोठी गळती लागली. वेळीच दुरूस्ती न केल्यास जलवाहिनी फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मंगळवारी शहरास पाणीपुरवठा झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एका दिवसात जलवाहिनी दुरूस्ती करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले.
----
जलवाहिनी झाली जीर्ण
पैठण शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार फुटत आहे. ती जलवाहिनी क्रॉंक्रीट बेड न करता सरळ काळ्या मातीत टाकण्यात आली आहे. पावसाळा व उन्हाळ्यात होणाऱ्या जमिनीच्या आकुंचन व प्रसरण प्रक्रियेत जलवाहिनीवर दाब येत असल्याने वारंवार जलवाहिनी फुटत असल्याचे समोर आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पैठण शहरासाठी नवीन समांतर जलवाहिनी टाकण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.