शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:33 PM

शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, नियोजन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एक दिवसाने पूर्ण शहराचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. सिडको-हडकोसाठी प्रशासनाने केलेले नियोजनही कागदावरच राहिले आहे.

ठळक मुद्देएक दिवसाने पुरवठा पुढे ढकलला: सिडकोसाठी केलेले नियोजन पालिकेच्या आवाक्याबाहेर

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, नियोजन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एक दिवसाने पूर्ण शहराचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. सिडको-हडकोसाठी प्रशासनाने केलेले नियोजनही कागदावरच राहिले आहे.चार आणि सहा दिवसांआड नियमित पाणीपुरवठा होईल, असा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता. परंतु त्यात आता एक दिवसाचा खंड पडला आहे. सिडको-हडकोला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा दावा महापौर आणि मनपा प्रशासनाने केला. मात्र, ती घोषणा हवेत विरली आहे. जायकवाडीने तळ गाठला असून, टंचाई नियोजनासाठी विभागीय प्रशासनाने एक महिन्यापूर्वी प्रस्ताव मागविला होता. मनपाने २ जून रोजी प्रस्ताव दिला. अतिरिक्त पंपिंगसाठी शासनाकडून निधी वेळेत मिळणे शक्य झाले असते. परंतु त्यावर मनपाने लक्ष दिले नाही. १५६ ऐवजी १३५ एमएलडी पाणी जायकवाडीतून उपसा होत असून, ११५ ते १२० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. परिणामी कमी वेळ पाणीपुरवठा आणि काही भागांत खंड देण्यात येत असल्याने नागरिक संतापले आहेत.जायकवाडीच्या डाव्या कालव्यालगत पालिकेने ६ तरंगते जल उपसापंप बसविले. परंतु वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे उपशावर परिणाम झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्या पंपांच्या विद्युत मोटारी जळाल्या. सध्या चार पंप बंद पडल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी शहराला कमी पाणीपुरवठा होतो आहे.एक दिवसाने वेळापत्रक पुढेजायकवाडीतील पंपिंग स्टेशनवर बिघाड झाल्यामुळे एक दिवसाने पाणीपुरवठा वेळापत्रक पुढे ढकलले आहे. गुरुवारी एन-१२, एन -११, पुंडलिकनगर गजानननगर, ज्योतीनगर, एन- ७, उल्कानगरी, विश्वभारती कॉलनी, गारखेडा आदी भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र एक दिवसाचा खंड पडल्याने या भागांना शुक्र वारी पाणीपुरवठ्याचा दावा करण्यात येत आहे.१५ कोटींच्या खर्चाचा प्रस्तावसिडको-हडकोचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी एक्स्प्रेस वाहिनीवरील बायपास बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जुने शहर, फारोळा जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडीतील एमबीआर दुरुस्तीच्या कामासाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव गुरुवारी स्मार्ट सिटी योजनेच्या एसपीव्हीच्या बैठकीत ठेवला. ज्युबिली पार्क येथे ३ कोटी १२ लाखांतून विविध कामे करणे, कोटला कॉलनी, दिल्लीगेट, मकईगेट ४ कोटी ७६ लाखांतून जलवाहिनी टाकणे, सूतगिरणी व गारखेडा येथे सव्वादोन कोटी, नक्षत्रवाडी, एमबीआर व फारोळा पंपिंग स्टेशन व इतर दुरुस्तीसाठी साडेपाच कोटी मिळून १५ कोटींचा प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठेवला. चर्चेअंती या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात