उंडणगाव गावाजवळ निसर्गरम्य नंगेबाबा महाराज संस्थान व नंगेबा वाडी आहे. या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा गेल्या पाच वर्षांपासून काही कारणास्तव बंद पडलेला होता. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची पाण्याअभावी गैरसोय होत होती. नव्याने आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या पुढाकाराने या पाणीपुरवठा योजनाचा शुभारंभ हभप साळुबा बाबा महाराज सनान्से यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच दत्तात्रय बोराडे, कृष्णा उखर्डे, सदस्य दिलीप पाटील, पंकज जयस्वाल, लक्ष्मण पाटील, नागेश लांडगे, विश्वनाथ पाटील, मुन्नासेठ दुसाद, नारायण लांडगे, शामराव लांडगे, दगडूबा सनान्से, हरिदास वानखेडे, सुभाष बोराडे, अर्जुन पाटील, रामदास पाडळे आदींची उपस्थिती होती.
फोटो : उंडणगाव येथील नंगेबाबा संस्थान व नंगेबा वाडी येथे गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.