शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

फळबागांना टँकरने पाणी

By admin | Published: April 20, 2016 11:45 PM

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़ अशाही प्रतिकुल परिस्थितीत जीवापाड सांभाळलेली फळबाग करपू लागल्याने मनाठा येथील संतोष मालीवाल या शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणी आणून फळबाग वाचविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे़गेली १०-१२ वर्षांपासून जोपासलेली मोसंबीचे ५०० बुड यावर्षी वाचविणे त्यांना कठीण झाले़ १५ एकर जमिनीमध्ये असलेल्या या फळबागेत इतर कोणतेही पीक घेता येत नाही़ त्यामुळे वर्षाचे उत्पन्न या फळबागेवर घ्यावे लागते़ वातावरण बदलामुळे गत दोन वर्षे गारांचा फटका बसला़ त्याचा उत्पन्नावर फरक पडला़ शेतामध्ये पाच सालगडी आहेत़ वर्षाकाठी त्यांना अडीच ती-तीन लाख रुपये द्यावे लागतात़ काढायचे कुठून ज्या शेतामध्ये ही फळबाग आहे़ तिथे ५० फुट खोलीची विहीर आहे, पण फळबागेला पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी दुसऱ्या शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे या विहिरीत आणून सोडण्याचा निर्णय घेतला़ यासाठी दिवसाआड पाचशे रुपये भाडे द्यावे लागते़ कधी तीन कधी चार फेऱ्या टँकरद्वारे केल्या जातात़ दोन्ही विहिरींचे मिळून हे पाणी फळबागेला देणे सुरू आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी कमीच पडत आहे, असे त्यांनी सांगितले़ उन्हाळा आणखी दीड महिना आहे़ त्यामुळे पाणी किती दिवस पुरेल सांगता येत नाही़ ५०० बुडापैकी किती झाडे मरतील सांगणे कठीण आहे़ परंतु आपल्या शेतातील उभे पीक मरू नये, यासाठी कर्जबाजारी होवून हा शेतकरी खर्च करतो आहे़ (वार्ताहर)मनाठा गाव डोंगराळ.जमिनीही हलक्या प्रतिच्याच़ पाण्याची व्यवस्थाही जेमतेमच़ कोरडवाहू जमिनी कसता कसता शेतकऱ्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात़ काही सुशिक्षित तरूण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवित असतात़ गेल्या तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई आहे़ शेतीत पेरलेलेही उगवले नाही, झालेला खर्चही निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी हताश झाला़ कामाअभावी मजुरांनी स्थलांतर केले, अशा अवघड स्थितीत संतोष मालीवाल या शेतकऱ्याने पाच किलो मीटर अंतरावरून टँकरद्वारे मोसंबीच्या झाडाला पाणी देणे सुरू केले़ गावातील मोठे प्रस्थ पण त्यांनाही पाणीटंचाईने बेजार केले़ शेतामध्ये तीन विहिरी, एक अटली, तर दोन विहिरींना जेमतेमच पाणी, दोन विहिरींचे अंतर पाच किलो मीटरचे, त्यामुळे एका विहिरीचे पाणी दुसऱ्या शेतातील पिकाच्या काय कामी पडणार?