औरंगाबाद : शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचा प्रताप हळूहळू चव्हाट्यावर येत आहेत. कंपनीने मागील दीड वर्षांमध्ये पाणीपट्टी वसुलीत महाघोटाळा केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. यासंदर्भात मनपाच्या लेखा परीक्षण विभागाने एक खळबळजनक अहवाल आयुक्तांसह स्थायी समितीला सादर केला आहे.महापालिकेने दीड वर्षापूर्वी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला सोपविला. कंपनी मागील दीड वर्षापासून औरंगाबादकरांकडून पाणीपट्टी वसूल करीत आहे. वसूल केलेली ठराविक रक्कम मनपाकडे वर्ग करावी, असे करारात नमूद केले आहे. कंपनीने ग्राहकांकडून मागील थकबाकीची वसुली, अभय योजनेत अनधिकृत नळ अधिकृत करणे आदी ‘महसुली’कामांवर अधिक लक्ष दिले. कंपनीच्या या कारभारावर मनपाचा कोणताच अंकुश राहिलेला नाही. कंपनीने अत्यंत मनमानी पद्धतीने वसुलीवर भर दिला. पाणीपट्टीच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम एका ठराविक बँकेत जमा करावी, असे करारात नमूद केले आहे. कंपनीने असे न करता दुसऱ्या एका बँकेत ही रक्कम ‘समांतर’स्वरूपात वळवून टाकली. त्यामुळे वसुली किती आली आणि कंपनीने कुठे वापरली याची कुठलीही माहिती मनपाला नाही. मनपाच्या लेखा परीक्षण (पान २ वर)
पाणीपट्टी वसुलीत सव्वाकोटीचा घोटाळा
By admin | Published: March 17, 2016 12:18 AM