शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

अंडरग्राऊंडमध्ये शिरले पाणी

By admin | Published: June 25, 2014 1:25 AM

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रोडवरील ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा आज पहाटे ५ वा. जोड निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले.

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रोडवरील ३०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचा आज पहाटे ५ वा. जोड निखळून लाखो लिटर पाणी वाया गेले. अर्धा तास पाणी वाहून वाया गेल्यामुळे चार वॉर्डांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सादातनगर, राहुलनगर, हमालवाडा, रेल्वेस्टेशन परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला. वेदांतनगर येथील जीवन प्राधिकरणाच्या आवारातील जलकुंभातून ती जलवाहिनी वरील वॉर्डांत जाते. जलवाहिनीचे पाणी सिद्धार्थ आर्केड या व्यापारी संकुलाच्या अंडरग्राऊंडमधील दुकानांमध्ये शिरले. दुकानातील पाणी दुपारी १ वाजेपर्यंत उपसून टाकण्यात येत होते. व्यापाऱ्यांनी या घटनेसाठी पालिकेला व कंत्राटदाराला दोषी धरले. का फुटली जलवाहिनीक्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ६०० मीटर अंतरातील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम १५ लाख रुपयांच्या खर्चातून सुरू आहे. २०० मीटरचे काम संपले आहे. आणखी ४०० मीटरचे काम बाकी आहे. पाणीपुरवठा बंद करून काम करणे शक्य नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जलवाहिनीला जोड देऊन पाणीपुरवठा केला जात आहे. गोल्डी सिनेमागृहाजवळील जोड उच्चदाबामुळे निखळून पडला. त्यामुळे जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी खोदलेल्या आठ फूट खड्ड्यांमध्ये पाणी साचले. ते पाणी सिद्धार्थ आर्केड व लाभ चेंबर्सच्या अंडरग्राऊंडमध्ये शिरले. लाईनमनचा अंदाज चुकलाजलवाहिनीचा व्हॉल्व्ह उघडताना लाईनमनचा अंदाज चुकला. त्याने जी जलवाहिनी बंद आहे, तिचा व्हॉल्व्ह उघडला. तो व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडल्यामुळे पाणी प्रेशरने गेले आणि जोड निखळला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले. 1सिद्धार्थ आर्केडमध्ये तळघरात असलेल्या दुकानांमध्ये साचलेले पाणी असे मोटार लावून बाहेर काढण्यात आले.2तळघरात साचलेले पाणी.3जलवाहिती वळविण्याच्या कामात त्रुटी राहिल्याने परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले.व्यापारी म्हणतात लाखोंचे नुकसान मधुर मिलन मिठाई विके्रते बी. एच. राजपुरोहित म्हणाले, अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी किचनपर्यंत गेले. अंडरग्राऊंड वॉटरप्रूफ आहे. मनपाच्या व कंत्राटदाराच्या चुकीमुळे पाणी आत शिरले. ट्रॅव्हल एजन्सीचे मालक आमेर हुसैनी म्हणाले, पाण्यामुळे संगणक खराब झाले. झेरॉक्स मशीनमध्ये पाणी गेले. नवीन फर्निचरचे काम सुरू होते. त्याचेही नुकसान झाले आहे.ज्यूस सेंटरचे मालक मन्नान खान म्हणाले, पाण्यामुळे फ्रीज जळाले आहे. पाण्यामुळे फरशी उखडून गेली. दुकानात २ फु टांपर्यंत पाणी झिरपून आले आहे. उपसण्यासाठी मशीन लावावी लागली. फास्ट फूड चालक ललित भंडारी म्हणाले, मनपाने कामाची नोटीस देणे गरजेचे होते. निष्काळजीपणे मनपाने काम केले. त्याचा भुर्दंड आमच्यासारख्या सामान्य व्यापाऱ्यांना बसला. हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न आहे.