शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

उदासीन प्रशासनामुळे पाणचक्की जर्जर

By admin | Published: July 12, 2017 12:42 AM

औरंगाबाद : जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांना मोहिनी घालणारी पाणचक्की आता उत्तरार्धात प्रवेशली असून, अवस्थेने जर्जर झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अचाट अभियांत्रिकीतून जलव्यवस्थापनाचा विस्मयकारक प्रयोग आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पाणचक्की. राज्याच्या पर्यटन राजधानीतील पाणचक्की हे एक ऐतिहासिक; परंतु दुर्लक्षित संचितापैकी एक. तीनशे वर्षांपासून जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांना मोहिनी घालणारी पाणचक्की आता उत्तरार्धात प्रवेशली असून, अवस्थेने जर्जर झाली आहे. कधीकाळी सैनिक व अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या शीलेदारांना रसद पुरविणारी ही चक्की आता सांभाळकर्त्या वक्फ बोर्डाच्या उदासीनतेने आपल्याच भोवताली पसरलेली अस्वच्छता व दुर्गंधीने घुसमटते आहे. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना तर हे पाहून धक्काच बसतो. शेवाळलेल्या भिंती, दुर्गंधीयुक्त पाणी, कारंजे, प्लास्टरची पडझड झालेल्या भिंती. एकूणच परिसरात प्रवेश करताच दुर्गंधीने नाकाला रुमाल लावल्याशिवाय पर्याय राहत नाही. ‘पाणचक्कीबद्दल खूप ऐकले होते. पाणचक्कीचे तंत्रज्ञान आणि यंत्रणेविषयी ऐकूनच मनात उत्सुकता निर्माण झाली. आम्ही सर्व आठ जण मुंबईहून सहकुटुंब येथे फिरायला आलो. आम्ही मुद्दामहून पाणचक्कीला भेट दिली; मात्र येथे आल्यावर सगळा भ्रमनिरास झाला.’ हे शब्द आहेत मुंबईहून खास पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाचे. पाणचक्कीच्या हौदातील पाण्यावरील कचरा आणि शेवाळ पाहून त्यांचा पुरता हिरमोड झाला होता.१७ व्या शतकाच्या शेवटी तयार करण्यात आलेली ही वास्तू एकेकाळी दख्खनचे सर्वात महत्त्वाचे ज्ञानकेंद्र होते. बाबा शहा मुसाफिर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पाणचक्कीचे काम त्यांचे शिष्य बाबा शहा महेमूद यांनी पूर्ण केले. जटवाड्याच्या डोंगरावरून नहरींद्वारे येथे पाणी आणून जलप्रपातामधून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाच्या साहाय्याने मोठे दगडी जाते फिरवून त्यामध्ये पीठ दळण्याची अद्भुत अभियांत्रिकी कल्पना येथे उपयोजिली गेली. त्यातून विद्यार्थी, प्रवासी आणि सैन्याची रसद भागविली जाई.शेवाळ आणि दुर्गंधीपाणचक्कीच्या भिंतीवरून खाली हौदात पडणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद आणि ४ फूट खोल असणाऱ्या या हौदाची सुमारे ४.८ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शेवाळ आणि कचऱ्यामुळे हौदातील पाणी काळवंडलेले दिसते. शेवाळलेल्या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. हौदाच्या मधोमध असलेले कारंजे तर शेवाळाने पूर्णपणे झाकोळून गेले आहेत. पाण्यामध्ये झाडांचा पाला-पाचोळा, प्लास्टिकची वेष्टणे-कप, रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. अशा दृश्याने आपले स्वागत होईल अशी पर्यटकांनी कल्पनाही केलेली नसते. संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे. कधीकाळी निर्मल नीर वाहणाऱ्या खाम नदीच्या तीरावर उभी असलेली ही वास्तू आता मात्र एका सांडपाण्याच्या नाल्याच्या शेजारी आहे. बाजूने वाहणाऱ्या नाल्यामुळे येथे कायमच दुर्गंधी असते.