लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.विद्यापीठातील वसतिगृहे, सामाजिकशास्त्रे इमारत, अभ्यासिकेसह इतर इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याची मागील सहा महिन्यांपासून समस्या आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले; मात्र कुलगुरू बैठकीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीच्या प्रवेद्वारावरच तीव्र आंदोलन सुरू केले. सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावले. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रवेशद्वारातच खुर्चीवर दगड ठेवून श्रद्धांजली सभा घेतली. या खुर्चीची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात डॉ. कुणाल खरात, अक्षय पाटील, अमोल दांडगे, लोकेश कांबळे, मयूर सोनवणे, दीपक बहिर, मनीषा मगरे, प्राजक्ता शेटे, सत्यजित मस्के, प्रशांत बोर्डे, गणेश शिंदे आदी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन स्थगितप्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यानंतरही प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी कोणीही आले नाही. बºयाच वेळेने विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, मुख्य अभियंता रवींद्र काळे, अशोक देशमाने आदींनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. एका दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. यावर विद्यार्थ्यांनी चार दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर कुलगुरूंच्या निवासस्थानावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
पाण्याचा ठणठणाट ; विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:36 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
ठळक मुद्देविद्यापीठ : कुलगुरूंच्या भेटीला मज्जाव केल्यामुळे विद्यार्थी संतप्त; घोषणाबाजीने परिसर दणाणला