लातूर : बहीण-भावासाठी आनंदाची पर्वणी देणारा राखी पौर्णिमा सण रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला़ ओवाळीत माझ्या भाऊरायाला़़़ असे गुगणगुणत भगिणींनी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून सणाचा आनंद द्विगुणित केला़श्रावणमास सुरू झाला की, सर्वांना राखी पौणिृमा उत्सवाची उत्सुकता असते़ राखी पौर्णिमा उत्सवापासून सणांना प्रारंभ होतो़ गुरूवारी शहर व जिल्ह्यात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला़ बुधवारी सायंकाळी शहरातील बाजारपेठेत भगिनींची राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होती, तर आपल्या बहिणींकडे जाण्यासाठी भाऊरायाची बसस्थानकात धावपळ सुरू होती़ विशेष म्हणजे हा सण रविवारी आल्याने आनंद आणखी द्विगुणित झाला़ गुरूवारी सकाळपासून घरोघरी भगिंनी आपल्या भाऊरायाच्या हातात राखी बांधून ओवाळत होत्या़ भाऊरायाच्या आवडीचे खाद्यपदार्थही बनविण्यात आले होते़ आनंदोत्सव साजरा होत होता़ (प्रतिनिधी)भावास ओवाळल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी पेढ्याचा उपयोग केला जातो़ शहरातील बाजारपेठेत मागणी वाढल्याने गुरूवारी काहींनी पेढे मिळू शकले नाहीत़ त्यामुळे साखरेवरच तोंड गोड करावे लागल्याचे पहावयास मिळाले़४भावाला राखी बांधण्यासाठी बहिणींची दिवसभर धावपळ होती़ भाऊरायाला राखी बांधून औक्षण करण्यात आले़
ओवाळीते माझ्या भाऊराया ़़़
By admin | Published: August 19, 2016 12:47 AM