शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 12:00 PM

Aurangabad Municipal Corporation Election : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरणभाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिक

औरंगाबाद : आगामी महापालिकेच्या निवडणुकांत ( Aurangabad Municipal Corporation Election ) महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आले तर एकत्र, नाहीतर स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांनी शुक्रवारी दिले.

‘लोकमत’ कार्यालयाला शुक्रवारी दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह संपादकीय सहकारी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल. त्यांना वेगळे लढायचे असेल तर आनंदच आहे. मात्र, एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी आघाडी करून तिकीट वाटप केले तर प्रत्येकाचा लढण्याचा स्कोप कमी होईल. या निवडणुकीत तळागाळातील असंख्य इच्छुक असतात. त्यांना सामावून घ्यावे लागते. एकत्र लढल्यास सर्वांना एकत्र कोंबण्याचा प्रयत्न होईल, त्यातून नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे.

स्थानिक पातळीवर शिवसेनेचा विस्तार मोठा आहे. अनेक वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे. परंतु, महाविकास आघाडीसोबत विरोधाचा अट्टहास नाही. जर जुळले तर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसावे. चर्चा करून अहवाल द्यावा, निर्णय वरिष्ठ घेतील. हा मत व्यक्त करण्याचा पहिला टप्पा आहे.

भाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिकमहापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर भाजपसारखा ‘पाॅवरफुल्ल’ पक्ष आहे. त्याचे आव्हान कसे पेलणार, या प्रश्नावर देसाई म्हणले, त्यांच्या पाॅवरफुल्ल शब्दातील प्रत्यक्ष ‘पाॅवर’ किती आणि ‘फूल’ बनविण्याची क्षमता किती, हा चर्चेचा विषय आहे.

समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्टमुळे कनेक्टिव्हिटीदेसाई म्हणाले, समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्ट सुविधांमुळे मुंबई बंदराच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटला आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होत आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर येथून आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करू शकतील. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी यावर पुढील आठवड्यात चर्चा करणार आहे.

पैठणला जाण्यास दीड तासऔरंगाबाद ते पैठण रस्ता खराब आहे. ती कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एमआयडीसीला प्रयत्न करण्यास सांगितले आहे. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क त्याच रस्त्यावर आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही रस्त्याला प्राधान्याने करण्याची तयारी दर्शविली आहे. १५० कोटी पहिल्यांदाच शहर रस्ते विकासाला दिले. एमएसआरडीसी, एमआयडीसी, मनपाकडून ती कामे करण्यात आली आहेत, असेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

जायकवाडी भरलेले असताना शहराला पाणी नाहीयावर पालकमंत्री देसाई म्हणाले, १६८० कोटींच्या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. ५२ जलकुंभांचे काम सुरू आहे. या योजनेला अजून अडीच वर्षे लागतील. मग ताेपर्यंत पाण्यासाठी थांबायचे का? यावर उपाय म्हणून दोन महिन्यांत डिसेंबरमध्ये पाण्याच्या दिवसांचे अंतर कमी केले जाणार आहे. त्यासाठी जुन्या पाईपलाईनचे काही पाईप बदलून जास्त पाणी आणण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले आहेत.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईRajendra Dardaराजेंद्र दर्डाAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका