छत्रपती संभाजीनगर : रेल्वे प्रशासनाने लाइन बाॅक्स बंद करून रेल्वे गार्ड (ट्रेन मॅनेजर) यांना ट्र्राॅली बॅग देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ट्राॅली बॅगमुळे रेल्वेच्या गार्डची कुलीसारखी स्थिती होईल. त्यामुळे लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास विरोध दर्शवित बुधवारी ऑल इंडिया गार्ड काऊन्सिलने रेल्वेस्टेशनवर निदर्शने केली.
आंदोलनाप्रसंगी संघटनेचे राजीव रंजनकुमार, अरविंदकुमार, विभाष मिश्रा, सुनील महाजन, एस. एस. मिना यांच्यासह मोठ्या संख्येने गार्ड उपस्थित होते. यावेळी लाइन बाॅक्स कायम ठेवण्याची मागणी करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या.
काय असते लाइन बाॅक्स?लाइन बाॅक्समध्ये सिग्नलच्या दृष्टीने आवश्यक लाल, हिरवा झेंडा, बॅटरी, आपत्कालिन परिस्थिती सिग्नल दाखविण्यासाठीची यंत्रणा, आवश्यक स्टेशनरी आणि इतर साहित्य असते. याचे जवळफास २५ ते ३० किलो वजन असते. हा बाॅक्स रेल्वेत ठेवण्यासाठी ‘बाॅक्स बाॅय’ असतात. परंतु ट्राॅली बॅग दिल्याने हे सर्व साहित्य गार्डलाच सांभाळावे लागेल. ‘बाॅक्स बाॅय’च्या नोकरीही संपुष्टात येतील, असे संघटनेने सांगितले.