शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:45 PM

बाजार समितीला मुदतवाढ मिळू नये या हेतूने या तक्रारी करण्यात येत आहेत. यासंदर्भात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे पठाडे यांनी सांगितले

औरंगाबाद : राज्यातील ८० कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मुदत संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. परंतू औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात असल्यामुळेच मुदतवाढ न देता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्याविरूद्ध  खोट्या तक्रारी  करण्यात आल्या.  या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी दि. २४ रोजी सांगितले.

याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माजी आ. डॉ. कल्याण काळे यांच्यावर टीका केली. डॉ. काळे हे त्यांच्या मामांना पुढे करून तक्रारी करीत आहेत. ते १० वर्षे आमदार राहिले. परंतू त्यांना एकही सहकारी संस्था  ना उभी करता आली ना  चालविता आली. आता ते हरिभाऊ  बागडे  यांना वृद्ध नेता संबोधून त्यांची लाज काढत आहेत. यावरून काळे यांची संस्कृती काय असू शकते, हे लक्षात येते असा टोला पठाडे यांनी लगावला.

बाजार समितीला मुदतवाढ मिळू नये या हेतूने या तक्रारी करण्यात येत आहेत. यासंदर्भात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे पठाडे यांनी सांगितले. कोणतेही कर्ज न काढता, शासनाचे अनुदान न घेता गेल्या अडीच वर्षांत  हरिभाऊ  बागडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध विकासाची कामे केली असून पहिल्यांदाच  ही अशी कामे झाल्याचा  दावाही पठाडे  यांनी केला. 

ही अशी कामे बंद कशी होतील याचा प्रयत्न डॉ. काळे यांनी केला असून २०१० ते २०१५ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही  त्यांनी  होऊ  दिली नाही. देवगिरी साखर कारखान्याचेही त्यांनीच वाटोळे केले, असा आरोपही पठाडे यांनी केला. यावेळी माजी उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक गणेश पाटील दहीहंडे, श्रीराम पाटील शेळके, बाबासाहेब मुगदल आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीMarketबाजार