शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज

By admin | Published: July 14, 2017 12:19 AM

नांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे स्पष्ट केले. गुरुवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाऱ्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभाग रचनेसह आरक्षण सोडतही घोषित केली आहे. या आरक्षण सोडतीवर १९ जुलैपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. प्रशासकीय स्तरावर या निवडणुकीची तयारी सुरू आहे. राजकीय पक्षही कामाला लागले आहेत़ सेना भाजपाच्या बैठकीच्या स्वतंत्र फेऱ्या सुरू आहेत़ तर काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्जही मागविले आहेत़ या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला़ राज्यातील कारभारावर निशाणा साधताना त्यांनी सरकारवर टीका केली़ त्याचवेळी स्थानिक पातळीवर होणाऱ्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीवरही खा. चव्हाण यांनी भाष्य केले.आम्हीही या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. महानगराध्यक्ष व त्यांच्या टीमकडून निवडणुकी संदर्भातील आखणी केली जात असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसमधील काही नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत त्यांना विचारले असता असे काही घडणार नसल्याचे ते म्हणाले. एमआयएमच्या दहा नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश कधी होणार? या प्रश्नावर सर्व काही होईल. घाई करण्याची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत विचारले असता त्याबाबत पुढे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले़ अजून निवडणुकीला वेळ असल्याचे सांगून त्यांनी विषय थांबविला. अधिक माहिती महानगराध्यक्ष देऊ शकतील, अशी टिपणीही त्यांनी वेळी केली. दरम्यान, काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज १४ जुलैपासून मागविले आहेत़ काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जादा असल्याचे सांगितले जात आहे़ त्याच वेळी उत्साहही मागील निवडणुकीपेक्षा कैकपटीने वाढला आहे़ आगामी काळात आघाडी आणि युतीवर चर्चा होईल़ यावेळी आ. अमर राजूरकर, आ. डी.पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, माजी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, वीरेंद्रसिंघ गाडीवाले, शफी अहेमद कुरेशी, संतोष पांडागळे, विजय येवनकर, शाम दरक आदी उपस्थित होते.