शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनाएकनाथ शिंदे गट, यांच्यात 'नालायक' या शब्दावरून जबरदस्त शाब्दिक चकमक सुरू आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'नालायक' शब्द वापरत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यानंतर दोन्ही गटात शब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. आता या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे. "नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून तुम्हाला ही सत्ता भोगता आली होती, हे विसरू नका," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ते प्रत्रकारांसोबत बोलत होते.
शिरसाट म्हणाले, "परवाच पृथ्विराज चव्हान म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सरकार कोसळले, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. एकंदरित असे चित्र आहे. तुम्हाला ते तर जवळही घ्यायला तयार नाहीत. तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलत आहात. नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून तुम्हाला ही सत्ता भोगता आली होती, हेही विसरू नका."
तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात -"या नालायक शब्दासंदर्भा जे स्पष्टिकरण देत आहेत, त्या नालायकांना मला सांगायचे आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, पण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण नालायक शब्द चांगला आहे. तुम्हाला तो आवडतोय, म्हणून मी तो वापरतोय. नालायकांनो ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वासाठी आपली हायात घालवली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू नये, असे ज्यांचे मत होते. त्यांचे मत डावलून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. खरे तर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना हे मांडीवर घेऊन बसू लागले आहेत. म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येऊ लागले आहेत. जे यांना शिव्या देत होते. जे यांची टिंगल टवाळी करत होत्या, अशा लोकांच्या सहवासात असल्याने यांच्या तोंडात असे शब्द येत आहेत," अशा बद्दात शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांव हल्ला चढवला.
एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेलं नेतृत्व होत आहेत -एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे नेते झाल्याचे दुःख तुम्हाला होत आहे, शिवसेने प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत, याचं दुःख तुम्हाला होत आहे. एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेलं नेतृत्व होत आहेत, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही बसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार? हीच तुमची लायकी आहे ना. आज एकनाथ शिंदे सर्वधर्माच्या नेत्यांना एकत्र घेऊन सर्वांसामान्यांसाठी काम करत आहेत. मग तो मराठा असो ओबीसी असो, एसी असो, मग तो कुणठल्याही समाजाचा माणून असो, तो त्यांच्यासोबत जोडला जात आहे. ही तुमची पोटदुखी आहे," असेही शिरसाट यावेळी म्हणाले.
कोण तो दळवी-भोळवी... -शिरसाट म्हणाले, कोण तो दळवी-भोळवी तो, त्या कणकवलीला नारायण राणे यांच्या विरोधात प्रचार करायला आम्ही गेलो होतो. तेव्हा हा घर सोडून पळाला होता. म्हणून त्याला त्याची जागा आम्हीच दाखवली आहे. बुथवर हे बसत नव्हते आणि हे आम्हाला शिकवत आहेत.