शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:55 PM

तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.

ठळक मुद्देजायकवाडी : उन्हाळ्यातील तीन महिन्यांत १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते.मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना यासह विविध प्रादेशिक पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी देण्यात येते. याच पाण्यातून नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या भागांतील शेती सिंचनाखाली येते. उन्हाळा सोडला, तर इतर कालावधीत दररोज ०.४०० ते ०.६०० दशलक्ष घनमीटर एवढे पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाते; परंतु उन्हाळ्याला सुरुवात होताच यामध्ये दुपटीने वाढ होते. यंदा मार्चमध्ये तापमानाचा पारा ३८.३ अंशांवर पोहोचला. त्यानंतर एप्रिलमध्ये ४१ आणि मे महिन्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत ताममान गेले. तापमान जसजसे वाढत गेले तसे जायकवाडीतील बाष्पीभवनही वाढत गेले. मार्च महिन्यात ४०.३७८, तर एप्रिलमध्ये ५०.००७ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. मे महिन्यात ४९.९०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जायकवाडी येथे बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आलेले आहे. यातून जलाशयात होणाऱ्या बाष्पीभवनाची नोंद होते.औरंगाबादला महिन्याकाठी जवळपास ९ दशलक्ष घनमीटर याप्रमाणे तीन महिन्यांसाठी सुमारे २७ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. तीन महिन्यांत बाष्पीभवन झालेल्या पाण्यातून किमान चार महिने जायकवाडीतून पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देता आले असते. पाण्याचे बाप्षीभवन थांबविण्यासाठी थर्माकोल, सोलार पॅनल इतर पर्यायांचा वापर केला जातो; परंतु जायकवाडीच्या पाण्याचे क्षेत्र पाहता हे अशक्य आहे. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. बाष्पीभवन हे नैसर्गिक चक्र असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनातून पाणी आटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे.काही प्रमाणात का होईना उन्हाळ्यात जायकवाडीतील पाणी छोट्या प्रकल्पात साठविण्याचा उपाय महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जायकवाडीमध्ये १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची फार अडचण नाही. पाणीवापराच्या नियोजनानुसार पाणीसाठा योग्य पद्धतीने पुरवला जात असल्याचे अधिकारी सांगतात.सेकंडरी स्टोअरची कल्पना४पाणी वाचविण्यासाठी उन्हाळ्यात सेकंडरी स्टोअर कल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकते. औरंगाबाद शहर परिसराला लागणारे पाणी १ मार्चनंतर जलवाहिनीद्वारे शहराजवळ छोट्या प्रकल्पात साठवायचे. प्रकल्प लहान असल्याने त्यातून कमी प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी वाचविणे शक्य आहे. अनेक देशांत ही कल्पना प्रत्यक्षात राबविली गेली आहे.-प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात