लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी (दि.७) पुणे येथील हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांच्या पथकाने जागेची पाहणी केली. यावेळी केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) यंत्रणा पुरविण्यात येणार आहे.पाहणीप्रसंगी पुणे येथील कृषी हवामान विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. एन. चट्टोपाध्याय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. प्रदीप इंगोले, प्रा. दीप्ती पाटगावकर आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे २१ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हवामानाची माहिती दिली जाईल. त्याचा शेतकºयांना निश्चित फायदा होईल.-डॉ. प्रदीप इंगोले, संचालक (विस्तार शिक्षण ), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठऔरंगाबादसह महाराष्ट्रात १० जिल्ह्यांत स्वयंचलित हवामान केंद्र बनविण्यात येत आहे. औरंगाबादेत त्यासाठी जागेची पाहणी झाली असून, लवकरच केंद्र सुरू केले जाईल.-डॉ. एन. चट्टोपाध्याय, उपमहाव्यवस्थापक, कृषी हवामान
स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:20 AM