औरंगाबाद : मागील आठवड्यात अचानक सोने व चांदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारणही तसेच होते. या दोन्ही मौल्यवान धातूचे भाव गगनाला भिडले आहेत. ऐन लग्नसराईत दागिने महागल्याने वधू-वराच्या वडिलांचे डोळे पांढरे झाले आहेत. तरीही सोने-चांदी खरेदीचीही योग्य वेळ आहे. पुढीलवर्षी अधिक मास येत आहे. या दागिन्यांचे भाव वाढणार आहेत. यामुळे अधिक मासात लाडक्या जावयाला देण्याचे सोने आताच खरेदी करा, असा सल्ला शहरातील ज्वेलर्स देत आहेत.
सोने ५४ हजारांवरमागील आठवड्यात सोने १० ग्रॅममागे ९०० रुपयांनी वाढले व शुक्रवारी ५४,३०० रुपयांना विक्री झाले. सोन्यात हळूहळू वाढ होत गेली.
२८ महिन्यांनंतर तेजी७ ऑगस्ट २०२० या दिवशी सोने ५६,१२६ रुपये (१० ग्रॅम) तर चांदी ७६,०८५ रुपये (किलो) दराने विकले गेले होते. त्यानंतर भाव उतरत गेले. तेजी-मंदीचा खेळ सुरूच होता. २८ महिन्यांनंतर सोने व चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.
२०२३ मध्ये अधिक महिनापुढील वर्ष १२ महिन्यांऐवजी १३ महिन्यांचे असणार आहे. हा अधिकच महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान असणार आहे.
जावयाला देण्यासाठी आताच करा सोने खरेदीपुढील वर्षी २०२३ मध्ये अधिक मास आला आहे. या काळात जावयाला सोन्याची अंगठी किंवा अन्य अलंकार, चांदीचे ग्लास देत असतात. त्या काळात सोन्याचे भाव सध्यापेक्षा आणखी वाढतील, सध्या सोने-चांदी महागले तरी पुढील वर्षी आणखी भाववाढ होईल, यासाठी सध्या सोने-चांदी खरेदी योग्य ठरले, असे सराफा व्यापाऱ्यांचे मत आहे.
सोने आणखी महागणारपुढील वर्षी अधिक मास म्हणजे वर्ष एक महिन्याने वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता सोने व चांदी कायम राहील. मार्च २०२३ पर्यंत भाव आणखी वाढतील. यामुळे सोने-चांदी खरेदीचा हा योग्य काळ होय.- नंदकुमार जालनावाला, ज्वेलर्स