शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 7:43 PM

१६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले

औरंगाबाद : मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी खेद व्यक्त केला. त्यांना शहरातील काही लोकप्रतिनिधी, नागरिकांचे शिष्टमंडळ भेटले. १६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. तसेच केंद्र शासनानेही यात लक्ष घालावे, यासाठीही राज्यपाल पत्रव्यवहार करणार आहेत.

गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांचे शहरात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वागत केले. नंतर राज्यपालांनी सुभेदारी विश्रामगृहात रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मानव विकास मिशन विभागाची बैठक घेतली. त्यांना भाजपचे शिष्टमंडळही भेटले. शिष्टमंडळाने शहरातील पाणीपुरवठा योजना, महिला सुरक्षा या मुद्द्यांबाबत निवेदन दिले.

औरंगाबादला जागतिक पातळीवर महत्त्व आहे ते पर्यटनस्थळांमुळे. त्यात वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद लेण्यांसह इतर पर्यटनस्थळांचे मोठे नाव आहे. जगभर ख्याती असलेल्या शहराला आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत? त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल म्हणाले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी, जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण राज्यपालांसमोर केले. यात इको बटालियन, वृक्षारोपण कार्यक्रमांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरदेखील राज्यपालांनी माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी राज्यपाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीला भेट देणार आहेत.

घरकुल योजनेला मिळेना जागापंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आ. सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे, लता दलाल, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरू असल्याची तक्रारही या शिष्टमंडळाने केली. घरकुल योजनेबाबत राज्यपाल सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आ. सावेंनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी