लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील कौठा रोडवरील श्रीकृष्ण मंदिर परिसरात राहणाºया एका आॅटोचालकाच्या मुलीला तिळ्या मुली झाल्या. एकाच वेळी तीन कन्या जन्मल्याचे स्वागत कुटुंबियांनी केले. अत्यंत गरीब परिवाराने कन्यारत्नाचे केलेले स्वागत समाजासमोर एक आदर्श करणारे आहे.वसमत येथील प्रकाश बाबाराव सूर्यवंशी या आॅटोचालकाची मुलगी पूजा संदीप गणेशपुरे (रा. बोरी खुर्द, ता. पुसद) ही पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. बाळंतपणाच्या शेवटच्या टप्प्यात केलेल्या तपासणीत डॉक्टरांनी तीन अपत्ये होणार असल्याचे सांगितले होते. तीन अपत्ये एकाचवेळी होणार असल्याचा आनंद व भीती असा दुहेरी प्रसंग कुटुंबियांवर ओढवला होता. महिलेचे वडील प्रकाश सूर्यवंशी हे आॅटोचालक व पती संदीप गणेशपुरे हेसुद्धा आॅटो चालवण्याचेच काम करतात. तीन अपत्ये होणार असल्याचे निदान झाल्यानंतर महिलेच्या पती किंवा कुटुंबियांनी मुले होणार की मुली, असा साधा प्रश्नही डॉक्टरांना विचारला नाही, हे विशेष. तिळ्या बाळांच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू केली. अखेर सिझर करावे लागणार असा सल्ला डॉक्टरांनी दिला. नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी सिझरद्वारे बाळंतपण झाल. तिन्ही मुलीच जन्मल्या. एकीकडे मुलींना नकोशी मानले जात असताना आॅटोचालकासारख्या गरिबाच्या घरी मात्र आंनदाने त्यांचे स्वागत झाले.सदर महिलेशी ‘लोकमत’ने चर्चा केली असता माझ्या घरात एकाच लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा अवतरल्याची प्रतिक्रिया बाळाच्या वडीलांनी दिल्याचे सांगितले.घरची कौटुंबिक परिस्थिती पाहता तीन मुलीच्या शिक्षण व भविष्याची चिंताही व्यक्त केली. शासनाच्या एखाद्या योजनेद्वारे मदत झाली तर सोन्याहून पिवळे होईल, अशी प्रतिक्रिया तीन मुलीची माता पूजा गणेशपुरे यांनी व्यक्त केली.
वसमतमध्ये तिळ्या कन्या जन्माचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:00 AM