औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा शनिवारी आझाद चौक, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा, शरीफ कॉलनी भागात पोहोचली. शेकडो कार्यकर्त्यांनी पदयात्रेचे जंगी स्वागत केले. रोशनगेट ते आझाद चौक रस्त्यावर पदयात्रेमुळे जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली होती. आझाद चौक येथून पदयात्रेला सुरुवात झाली. राजेंद्र दर्डा यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजराने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, राजेंद्र दर्डा यांनी या भागातील प्रत्येक घरात जाऊन घातलेल्या मतदानाच्या सादेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किराडपुरा, इब्राहीम मशीद, रोशन मशीद, तलाववाडी इ. भागांमध्ये पदयात्रेला स्थानिक रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत काही कार्यकर्त्यांनी राजेंद्र दर्डा यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. युवकांचा उत्साह पाहता संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. आझाद चौक ते रोशनगेटवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत परिसरातील नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिश्तिया कॉलनी, आविष्कार कॉलनीत घरोघरी भेटीराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज चिश्तिया कॉलनी, आविष्कार कॉलनी, संभाजी कॉलनीत पोहोचली. या भागातील प्रत्येक घरात जाऊन घातलेल्या मतदानाच्या सादेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिश्तिया कॉलनीतून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा पुढे आविष्कार कॉलनीत दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. राजेंद्र दर्डा यांनी थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. महाराणा प्रताप चौकातून हनुमाननगर, सिंहगड कॉलनी, साईनगर परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने सिडकोत जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह उभारण्यात आले. या नाट्यगृहामुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली. कलाकार, रसिक आणि नागरिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना सिडकोतील रहिवासी अनिल कोमटकर यांनी व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा पदयात्रेदरम्यान काही जुन्या कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांनंतर भेट झाली. तेव्हा राजेंद्र दर्डा यांनी त्यांची गळाभेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भागात राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या विकासकामांमुळे येथील रहिवाशांचे राहणीमान उंचावले असल्याची प्रतिक्रिया त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अयोध्यानगर, सुराणानगर भागात आज पदयात्राराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज सकाळी ८.३० वाजता वॉर्ड क्र. २५ अयोध्यानगर, १९ शिवनेरी कॉलनी, २६ गणेशनगर, एन- ८, सिडको भागात काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून पदयात्रेला सुरुवात होईल.४सायंकाळी ५ वाजता वॉर्ड क्र. २४, एन-१ सिडको, सुराणानगर या भागातून काढण्यात येणारी पदयात्रा गणपती मंदिरापासून सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचे जंगी स्वागत
By admin | Published: October 05, 2014 12:03 AM