शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात

By योगेश पायघन | Published: August 27, 2022 11:47 AM

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली.

औरंगाबाद -‘ज्येष्ठांना कुणी विचारत नव्हतं बरंय सरकारने तरी आमचा विचार केला. प्रवास मोफत केला. आता उपचारही मोफत करा’ अशा भावना मध्यवर्ती बसस्थानकात एसटी बस मधून उतरल्यावर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या बस वाहक म्हणाले, एक दोन प्रवास्यांना लाभ दिला. पण त्यांचा प्रवास एक दोन टप्प्याचाच होता. विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानक येथे वृक्षरोपणकरून या योजनेची माहीती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक संतोष घाने, विभागीय अध्यक्ष बाबासाहेब साळुंके पाटील, विजय पारखे, ललित शहा, संतोष नजन, दिपक बिराजदार, दिपक बागलाने, अंजली राऊत, कविता पिसोटे, अनिता सोंगिरे आदीसह वाहच, चालक, कर्मचारी उपस्थित होते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी....२६ ऑगस्ट १९४७ पुर्वी जन्मलेल्या तसेच ७५ वर्षावरील व्यक्तींना मोफत प्रवासासाठी आधार कार्ड, जन्मतारीख आणि पत्ता असलेले केंद्र, राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी दिलेले ओळख पत्र, पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड, तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र, रा.प. महामंडळाचे स्मार्टकार्ड, डीजी लाॅकर, एम आधार ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे सहाय्यक वाहतुक निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी सांगितले. राज्यातील हद्दीत बसप्रवासाची ही योजना असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास असला तरी ऑनलाईन आरक्षण, विंडो बुकींग, मोबाईलवरून बुकींसाठी आरक्षण शुल्क द्यावे लागणार आहे. योजना लागू होण्यापुर्वी आगावू आरक्षण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा देवून जवळच्या आगारात रक्कम परत मिळवता येणार आहे.

७० वर्ष करावे रायपुरहून सकाळी बसने आलो. माझे वय ७० आहे म्हणून मला मोफत प्रवासाची सवलच मिळाली नाही. मात्र, चांगली योजना आहे. ७५ एवजी ७० वर्षावरील व्यक्तींसाठी ही योजना करावी म्हणजे अधिक ज्येष्ठांना लाभ मिळाला असता.-देविदास बांडे, ज्येष्ठ नागरिक प्रवासी (रायपुर ता. जि. बुलडाणा)

सिटी बसमध्ये  लागू करा चौका येथून आले तर प्रवासाला पैसे लागले नाही. सर्व बसमध्ये योजना लागू म्हटले. मात्र, सिटी बसमध्ये ही योजना नाही. तीही बसच आहे. त्यात का लाभ मिळत नाही. बरंय, कुणी विचारत नव्हते. शासन आमचा विचार करतेय तेवढंच समाधान.-अनुसया गायकवाड, ज्येष्ठ नागरिक प्रवासी, चौका

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटीSenior Citizenज्येष्ठ नागरिकChief Ministerमुख्यमंत्री