नीट, एमएचटी सीईटी नंतर पुढे काय
(एलएमएस)
औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा याकरिता देशभरातील लाखो विद्यार्थी नीट (NEET), तर नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा याकरिता दरवर्षी एमएचटी -सीईटी देतात. नीट आणि एमएचटी- सीईटी मेडिकल आणि इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाते, किती टप्प्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते, नामांकित महाविद्यालयांत कसा प्रवेश घ्यावा, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, फिस स्ट्रक्चर काय आणि एज्युकेशन लोन (शैक्षणिक कर्ज) कसे उपलब्ध होईल, याविषयी अचूक मार्गदर्शन देणारी ‘द गाईड’ ही एकमेव संस्था शहरात उपलब्ध आहे.
‘द गाईड’ संस्थेचे संचालक चंद्रकांत उन्हाळे म्हणाले की, वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्याची स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. नीट दिल्यानंतर पुढे प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाते. कट ऑफ कसा ठरतो, महाविद्यालय मिळाल्यानंतर प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. प्रवेश कसा मिळतो, याविषयी कोणतेही अचूक मार्गदर्शन न मिळाल्याने पात्र विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतो. अर्जात तांत्रिक चुकी असल्याचे कारण दाखवून विद्यार्थी प्रवेशाला मुकतात. शिवाय कोणत्या महाविद्यालयाचे फिस स्ट्रक्चर काय आहे, आपल्याला शिष्यवृत्ती अथवा कर्ज उपलब्ध होईल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडतात. मात्र, त्यांना यासंदर्भात अचूक मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या हातून चुका होता, या चुकांमुळे त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होऊ शकते. असाच अनुभव एमएचटी-सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना येतो. नीट (NEET) आणि एमएचटी- सीईटीनंतर पुढे काय करावे, असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थी आणि पालकांना अचूक मार्गदर्शन देणारी ‘द गाईड’ संस्था २०१८ पासून उस्मानपुरा येथील मोर सुपर मॉलसमोरील घोरपडे कॉम्पलेक्समध्ये सुरू केली. अल्पावधीत या संस्थेने हजारो विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केल्याने त्यांच्या अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्चित झाला.
अपूर्ण..(भाग१)