शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 09, 2023 12:59 PM

विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतच हे लाल मुळे बाजारात विक्रीला येत असतात.

छत्रपती संभाजीनगर : विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा... तुम्ही म्हणाल काय, मुळ्यात आणि गाजरात एवढा फरक कळत नाही का...? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल...! कारण, भाजीमंडईत गाजरासारखा हुबेहूब दिसणारा ‘मुळा’ विक्रीला आला आहे.

हे वाचून तुमची उत्सुकता वाढली असेल... गाजर म्हटले की, लाल, गुलाबी रंग किंवा आता केशरी रंगाचे गाजर आपण बघत असतो. मात्र, मुळा म्हटल्यावर ‘पांढरा’ रंग आपल्या डोळ्यांसमोर येतो. दुसऱ्या रंगातील मुळा आपण कल्पनाच करू शकत नाही; पण आता मुळ्याने आपला रंग बदलला आहे. गाजराच्या आकारातील व त्यासारखाच लाल, गुलाबी रंगाचा मुळा बाजारात आला आहे. गाजर म्हणून ग्राहक भाव विचारायला जातात आणि विक्रेता सांगतो, हे गाजर नव्हे, मुळा आहे; तेव्हा ग्राहकही आर्श्चयचकित होतात. असेच शुक्रवारी औरंगपुरा भाजीमंडईत घडले. पांढऱ्या मुळ्याप्रमाणेच १० रुपयांना एक लाल मुळा विकला जात आहे. ग्राहकही हौशीने तो मुळा खरेदी करत आहेत.

कुठून आला लाल मुळा ?खुलताबाद तालुक्यातून हा लाल मुळा बाजारात येत आहे. दररोज १ ते २ क्विंटल या लाल मुळ्यांची आवक होत आहे. विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतच हे लाल मुळे बाजारात विक्रीला येत असतात.

एक लिंबू ३०० रुपयांनाएक लिंबू ३०० रुपयांना म्हटलं की, तुमच्या भुवया उंचावल्या असतील, डोळे पांढरे झाले असतील; पण जरा थांबा, हा लिंबू म्हणजे गळलिंबू होय. अर्धा, एक ते दोन किलो आकारांतील या गळलिंबूचे एक नग भाजीमंडईत आकारानुसार २०० ते ३०० रुपयांना विकत आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढा भाव का... तर मूतखड्याचा आजार ज्यांना आहे, त्यांना गळलिंबूचा रस पाजविला जातो. यामुळे या लिंबाला मागणी असते.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद