औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांत केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी आले आहे. रविवारी विभागीय आयुक्तालयात दुपारी ३ वाजता पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा छायांकित आणि नुकसानीचा आढावा पथकाने घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महसूल उपायुक्त पराग सोमण आदी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.गेल्या पावसाळ्यातील ओल्या दुष्काळाची पाहणी आता कागदोपत्रीच करावी लागणार असून, वानगीदाखल काही तालुक्यांना पथक भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. ओला दुष्काळाची सत्यपरिस्थिती पाहता येणे सध्या शक्य नाही. दोन पथके दोन जिल्ह्यात पाहणी करून पूर्ण विभागात झालेल्या नुकसानीचा अंदाज लावतील. गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील ३६ लाख शेतकऱ्यांचे २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १,३४६ कोटींचा पहिला हप्ता मदतीपोटी देण्यात आला आहे. पाहणीनंतर केंद्राची मदत मिळेल.
ओल्या दुष्काळाची केवळ कागदोपत्री पाहणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 4:45 AM