शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काय? मराठवाड्याच्या वाट्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षाच

By संतोष हिरेमठ | Published: August 12, 2024 12:16 PM

दिल्ली आणि उत्तर भारतातील रेल्वे प्रवासाचे अंतर कमी होण्याकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जालना - जळगाव रेल्वे मार्गाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद - कन्नड - चाळीसगाव हा रेल्वे मार्ग कधी होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना आजघडीला मनमाडहून जावे लागत आहे. या रेल्वे मनमाडहून चाळीसगाव आणि जळगावमार्गे उत्तर भारताकडे जातात. छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगाव रेल्वेने जाण्यासाठी आजघडीला हा १६० किमीचा प्रवास करण्यासाठी ३ तासांपेक्षा अधिक वेळ जातो. छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव असा ९४ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केल्यास, मनमाड न जाता थेट रेल्वे गाड्या चाळीसगावला पोहोचतील. प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टळेल, असा प्रस्ताव होता. मात्र, कामाचा खर्च आणि मिळणारा परतावा, हे कारण पुढे करून हा मार्ग कागदावरच ठेवला जात असल्याची ओरड होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमार्गे होता मार्गगेली अनेक वर्षे छत्रपती संभाजीनगरमार्गे सोलापूर - जळगाव या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात येत होती. हा मार्ग सोलापूर - तुळजापूर - पैठण - छत्रपती संभाजीनगर - जळगाव असा होता. मात्र, हा मार्ग रेल्वे बोर्डाने कधी पुढे सरकविलाच नाही, अशी ओरड होत आहे.

लवकर मार्गी लागावाछत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वे मार्गाने दिल्लीचे अंतर कमी होईल. जालना - जळगाव रेल्वे मार्गाचा ‘रूट’ वेगळा आहे आणि या मार्गाचा ‘रूट’ वेगळा आहे. हा मार्ग लवकर मार्गी लावला पाहिजे.- डाॅ. अण्णासाहेब शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव नियोजित रेल्वे मार्ग संघर्ष समिती

रेल्वे मार्ग व्हावासोलापूर - तुळजापूर- धाराशिव - कुंथलगिरी - बीड - गेवराई राक्षस भुवन - पैठण - छत्रपती संभाजीनगर - कन्नड - चाळीसगाव असा लोहमार्ग झाल्यास दक्षिण भारत ते उत्तर भारत जोडण्यास मोठी मदत होईल. यामुळे मराठवाड्याची खूप मोठी सोय होईल. छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वे मार्ग झाल्यास मनमाड स्टेशनवरील लोड कमी होईल. या मार्गाला लागूनच नॅशनल हायवे क्रमांक ५२ जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक कमी होईल.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

छत्रपती संभाजीनगरला ब्रांच लाइनने जोडावेआगामी काळात छत्रपती संभाजीनगरला तब्बल साठ हजार कोटींचे मोठे प्रकल्प येत आहेत. असे असताना शहराच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र सरकारने प्राधान्य देणे अपेक्षित होते. सुमारे २० लाख लोकसंख्या आणि औद्योगिक पट्टा जालना -जळगाव बायपास करेल. त्यामुळे या प्रकल्पाचा मराठवाड्याला खरंच किती फायदा होईल याबद्दल शंका आहे. या मंजूर मार्गाला जर सिल्लोड - फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर अशी ब्रांच लाइन जोडली तर हा मार्ग फायद्यात येईलच, पण उद्योग आणि व्यापारासाठीही मोठी सोय होईल.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे