शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

काय बोलता, आता ‘वीट’ झाली मऊ अन् गोड !

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 02, 2023 12:27 PM

जसा विटांच्या आकारातील गूळ आला आहे तसे ‘मोदक’, ‘दिल’ (बदाम) आकारातील गूळही बाजारात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘विटा’ गोड झाल्या आहेत, असे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल ऐकावे ते नवल...! एरव्ही ‘लाल माती’च्या किंवा ‘ॲश’ने बनविलेल्या ‘विटा’ एकदम कशा काय गोड झाल्या, असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाला असेल. हा काही चमत्कार नव्हे...तर या गोड विटा बांधकामासाठी नव्हे तर खाण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. आता हे वाचल्यावर तुमची जाणून घेण्याची उत्सुकता आणखी वाढली असेल. अहो, थांबा जरा; कारण, या विटा ‘गुळा’पासून तयार केलेल्या आहेत !

६० रुपयांना एक वीटगूळ म्हटले की, आपणास पारंपरिक पद्धतीने बनविलेली ढेप आठवते. मात्र, आता काळानुरूप गुळाने आपला आकार बदलला आहे. अधिक आकर्षक आकारांत गूळ बाजारात विक्रीला आला आहे. त्यांतीलच एक आकार म्हणजे ‘वीटकरी’सारखा आकार होय. दुरून पाहिले तर हा गूळ म्हणजे वीटच वाटते; पण हातात घेतल्यावर कळते, हा विटेच्या आकारातील गूळ आहे. गुऱ्हाळ करणाऱ्यांची नवीन पिढी आता गुळाच्या आकारात नवनवीन बदल घडवून आणत आहे. सध्या एक आख्खी वीट ५५ ते ६० रुपये किलोने विकली जात आहे.

मोदक, दिलच्या आकारात गूळजसा विटांच्या आकारातील गूळ आला आहे तसे ‘मोदक’, ‘दिल’ (बदाम) आकारातील गूळही बाजारात आला आहे. आता दीड महिन्यावर संक्रांत येऊन ठेपली आहे; यामुळे पाव किलोपासून छोट्या आकारातील ढेपा येऊ लागल्या आहेत. मोदक ८० ते ८५ रुपये; तर बदाम ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.

गुळ ८०० रुपयांनी महागमागील वर्षी होलसेलमध्ये गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३००० रुपये विकत होते. सध्या ३४०० ते ३८०० रुपये क्विंटलने गूळ विकला जात आहे. एक क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांनी गूळ महागला आहे. लातूर येथील गावरान गूळ ४१०० ते ४५०० रुपये क्विंटल विकला जात आहे. हा गूळ शीतगृहातील आहे. नवीन गुऱ्हाळ सुरू झाले असून येत्या १५ दिवसांत नवीन गूळ बाजारात दाखल होईल.

गुळात आणखी भाववाढीची शक्यतामागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे भाव वाढले आहे. कडबा ४ ते ५ हजार रुपये विकत आहे; तर ऊस ३ ते ३२०० रुपये टन विकत आहे. यामुळे जनावरांना खाऊ घालण्यासाठी उसाचा वापर होत आहे. साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस जात आहे. यामुळे गुऱ्हाळाकडे ऊस कमी येत आहे. त्यात चोहोबाजूंनी मागणी वाढल्याने येत्या काळात गुळात भाववाढ होईल.- सुमतीलाल ब्रह्मेचा, व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्र