लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़ दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे बुधवारी लातूर दौऱ्यावर होते़ मार्केट यार्डातील स्व़ दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ मंचावर आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ़ त्रिंबक भिसे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, महापौर अख्तर शेख, मोईज शेख, अॅड़ त्र्यंबकदास झंवर, एस़ आऱ देशमुख, आबासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती़ राणे म्हणाले, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असून सर्वांनी सरकारशी संघर्ष करण्यासाठी तयार रहावे, असेही ते म्हणाले़ (अधिक वृत्त हॅलो २ वर)१९९९ ला विलासराव मुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता झालो़ शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अवघ्या चार दिवसानंतर यवतमाळ येथे स्व़ जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम होता़ तिथे विलासराव देशमुख आणि मी निमंत्रित होतो़ अनावरणाच्या कार्यक्रमास पोहोचण्यास मला उशिर झाला़ तत्पूर्वी अनावरण झाले होते़ सर्वजण परतत असताना मी तिथे पोहोचलो़ तेव्हा देशमुख यांनी चला असे म्हणत, आपल्या वाहनात घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी आरक्षित असलेल्या आसनावर बसविले़ विलासरावांच्या मनाचा मोठेपणा असा होता, असे नारायण राणे यांनी सांगितले़
विकासात भाजपाचे योगदान काय?
By admin | Published: August 27, 2015 12:12 AM