छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने २०१० मध्ये छत्रपती संभाजीनगर शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले. परंतु फक्त घोषणा करून राज्य सरकार मोकळे झाले. पर्यटन राजधानीचा साधा फलकही दिसत नाही. शहरात पर्यटन वाढीसाठी, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अपेक्षित कामे झाली नाहीत. गेल्या १५ वर्षांत पर्यटन राजधानीला काय मिळाले, असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्ताने तरी सरकारने ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. पर्यटन राजधानी, पर्यटननगरी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, देवगिरी (दौलताबाद) किल्ला, औरंगाबाद लेणी, पाणचक्कीसह अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. पर्यटननगरीसाठी शासनाकडून होणाऱ्या घोषणा फक्त कागदावरच राहतात. त्याचे पुढे काहीही होत नसल्याची ओरड होतेय. त्यामुळे ‘युनेस्को’च्या यादीतील दोन ऐतिहासिक वारसास्थळांसह अनेक पर्यटनस्थळे असणाऱ्या शहराकडे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
चार लाख भारतीय पर्यटकडिसेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यातील पाच पर्यटन स्थळांवर तब्बल चार लाख ७० हजार २३३ पर्यटकांनी भेट दिली. यात वेरुळ येथे सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली.
पाच हजार विदेशी पर्यटकपर्यटननगरीत डिसेंबरमध्ये ५ हजार ४६४ परदेशी पर्यटकांनी भेट दिली. सर्वाधिक परदेशी पाहुण्यांनी वेरुळ लेणीला भेट दिली.
विविध उपक्रमांची गरजपर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. पर्यटन राजधानी म्हणून साधा फलकही दिसत नाही. फिल्म टूरिझम, स्पोर्ट्स टूरिझम, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन यांनाही चालना मिळाली पाहिजे. हॉटेलचे दर मुंबई - पुण्यापेक्षा कमी असावेत.- जयंत गोरे, अध्यक्ष, मराठवाडा टुरिझम विकास संघटना
दर्जा दिला, पण विकास नाहीछत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा देण्यात आला. परंतु आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि मरठवाड्यातील पर्यटन क्षेत्राचा पाहिजे तसा विकास झाला नाही. अजिंठ्याला जाणारा रस्ता १० वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.- प्रफुल्ल मालानी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर
सर्व काही उदासीनपर्यटन राजधानी म्हणून घोषणा झाली. परंतु त्याचा शहराला पाहिजे तसा काही फायदा झालेला नाही. अजिंठा रोडची दुरवस्था कायम आहे. गाइड्सची संख्या कमी आहे. फ्लाइट कनेक्टिविटी नाही. शहराची प्रसिद्धी केली जात नाही. अजिंठा-वेरुळ महोत्सवाचे व्हिजन नाही. सर्व काही उदासीन आहे.- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन
या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज- पर्यटन राजधानी म्हणून शहरात फलक, सेल्फी पाॅइंट लावणे.- पर्यटक स्थळांवर स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी.- स्वच्छ आणि परवडणाऱ्या निवास सुविधा पुरवाव्यात.- शहरात आणि प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी मदत केंद्रे, माहिती केंद्रे उघडावीत.- स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकलेला प्रोत्साहन द्यावे.- पर्यटन राजधानीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रचार करावा.- व्हर्च्युअल टूर, आकर्षक फोटो आणि व्हिडिओद्वारे जागतिक पातळीवर लोकांना आकर्षित करावे.- प्रशिक्षित मार्गदर्शकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे.- मेडिकल टुरिझम, स्पोर्ट टुरिझम, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, फूड फेस्टिव्हल यांनाही चालना द्यावी.
पर्यटननगरीत गेल्या २०२४ मध्ये पर्यटननगरीत किती पर्यटक?महिना - देवगिरी किल्ला- बीबी का मकबरा- औरंगाबाद बुद्ध लेणी- अजिंठा लेणी- वेरूळ लेणी (भारतीय/परदेशी)जानेवारी-७३,३६२/५२४-१,३४,४६६/१,३०१-१७,४४९/२४३-५४,९७३/१७६४-१,९७,०४२/२,३८०फेब्रुवारी-४२,४८९/५९७- ८९,१५३/१८८-७,१८४/१७५- ३०,००८/२,१२९-१,२१,६७८/२,८९२मार्च- २४,७३६/३५४- ६२,३४८/९५०- ५,९९१/१४२-२२,८५९/१,६२२-१,१९,०८६/२,१६६एप्रिल-२३,३७३/१२८-७३,९२४/३८६-५,६२०/४५- १३,८२९/४९७-८५,७१७/७५१मे-२७,६३६/७३-१,०४,६६०/२७०-६,४५७/१८-२१,२२०/२७५-१,४०,४९१/४२१जून-३८,८५४/६०- १,१५,६६८/२४८-९,०३२/४९-२७,०२१/२८७-१,३९,६७१/३८५जुलै-४४,८३२/११२-८१,१२३/३२१-१२,६२६/४२- ३७,३२०/३७०-१,३७,९९६/५०५ऑगस्ट- ५२,१५०/१२३-८६,८५६/३७९-१२,६२७/३४-४३,८३८/६१०-१,३३,७९८/७,६६५सप्टेंबर-३८,५५६/१४१-६७,८७३/४८५-९,३६४/५४-३०,८००/७२४-१,०३,२६५/९६९ऑक्टोबर-२६,०२२/२७२-६३,६७९/६३०-७,३८२/६४-३२,०५०/१,१६५-९०,९७९/१,३५७नोव्हेंबर-४९,६८१/४२६-९३,९३३/१,०४४-११,१०१/२३७-४८,९३६/१,७१६-१,०९,७३८/२,३१५डिसेंबर- ७८,०९४/४८०-१,२५,०२२/९५०-१२,९६९/१७१-६७, १६७/१,६९३-१,८६,९८१/२,१७०