शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

सरकारचे करायचे काय, ...खाली मुंडके वर पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:42 AM

केंद्र, राज्य सरकारचे करायचे काय?... खाली मुंडके वर पाय’, ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस... शेतकºयांच्या गळ्यात पडलाय फास’, ‘महागाईने पसरले पाय जनतेने करायचे काय?’...अशा विविध घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीतर्फे स्वपक्षीय सरकार विरोधात महागाई दर कमी आणि जीएसटी रद्द करण्यासाठी निदर्शने.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘केंद्र, राज्य सरकारचे करायचे काय?... खाली मुंडके वर पाय’, ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस... शेतकºयांच्या गळ्यात पडलाय फास’, ‘महागाईने पसरले पाय जनतेने करायचे काय?’...अशा विविध घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीतर्फे स्वपक्षीय सरकार विरोधात महागाई दर कमी आणि जीएसटी रद्द करण्यासाठी निदर्शने.केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणेनंतर औरंगाबादेत महागाई, जीएसटी विरोधात निदर्शने केली. या निदर्शनाचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या व संपर्कप्रमुख डॉ. मनीषा कायंदे मुंबईहून आल्या होत्या. दुपारी १२ वाजता क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भगवा ध्वज फडकावून आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन दोन तास सुरू होते. यावेळी बोलताना डॉ. कायंदे म्हणाल्या, मागील काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रतिलिटर तब्बल ८ ते १० रुपयांनी वाढल्या. घरगुती गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. इतर दैनंदिन वापराच्या वस्तूही महागल्या आहेत. तरीही सरकार या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही. यासाठी शिवसेना सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत असल्याचे डॉ. कायंदे यांनी सांगितले. क्रांतीचौकात चुलीवर भाकरी थापून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाºयांनी भाकरी थापल्या. यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. जीएसटीच्या करामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक घायकुतीला आला असल्यामुळे हा कर रद्द करण्याची मागणीही यावेळी केली. या आंदोलनात उपमहापौर स्मिता घोगरे, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक कला ओझा, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, नगरसेविका सुमित्रा हाळनोर, सीमा खरात, शिल्पा वाडकर, सीमा चक्रनारायण, ज्योती पिंजरकर, संगीता लोखंडे, आशा भालेराव, सुनीता आऊलवार, अंजली मांडवकर, प्र्रतिभा जगताप, प्राजक्ता राजपूत, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, दुर्गा भाटी, रेखा वैष्णव, जयश्री घाडगे, सुलभा भोपळे, उज्ज्वला बिरारी यांच्यासह उपशहर, विभाग, शाखा संघटक, गटप्रमुख महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.