छत्रपती संभाजीनगर : शहरातील काही भागात मध्यरात्री वावरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे बिबटे मागील आठवड्यात नव्हे तर महिन्याभरापासून शहराच्या आसपासच्या परिसरात मुक्कामी असावे, असा अंदाज व व्यक्त केला जात आहे. कुत्रा, डुक्कर हे त्याचे आवडते खाद्य खाण्यासाठी ते मानवी वसाहतीत येत असतात. नागरिकांनी घाबरून न जाता, रात्री आपल्या घराच्या बाहेरील लाईट चालू ठेवावे व जर बिबट्या दिसला तर खाली वाकू नये, कारण, बिबट्या हा आपल्या नजरेच्या आतील प्राण्यांची शिकार करतो. असे माहितीपत्रक जुन्नर वनविभागाने प्रकाशित केले आहे.
बिबट्याच्या वावर असणाऱ्या क्षेत्रात रहिवाशांनी घ्यावयाची दक्षता :१) जिथे बिबट्या दिसतो त्या परिसरात त्या काळात शक्यतो समूहाने बाहेर जावे-यावे.२) बिबट्या उजेडाला दचकतो, यामुळे रात्रभर घराबाहेर लाइट चालू ठेवावेत.२) संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये.३) बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरड करावी व त्याला पळवून लावावे. त्यावेळी घाबरून न जाऊ नये तसेच खाली वाकू नये. खाली वाकल्यास तो हल्ला करु शक्यतो.४) रात्री उघड्यावर झोपू नये.५) शेतकऱ्यांनी शेतात पाणी देण्यासाठी रात्री जाताना सहकाऱ्यांसोबत जावे. अशावेळी मोबाइल किंवा रेडिओ असल्यास जोऱ्याने गाणी चालू ठेवावी. शक्यतो घुंगराची काठी जवळ बाळगावी.६) रस्त्यावरून जाताना अचानक बिबट्या रोड ओलांडताना दिसल्यास घाबरून जाऊ नये, त्यास डिवचण्याचा प्रयत्न करु नका.७) कधीही बिबट्याचा पाठलाग करु नये.कारण, तो घाबरून उलटा हल्ला करु शकतो.८) कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करु नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो.९) बिबट्या शक्यतो मानवी वसाहतीत राहत नाही, पण त्यास डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो प्राणघातक हल्ला करु शकतो.१०) कुत्रे, डुकरे, बकरी खाण्यासाठी कधी कधी बिबटे मानवी वसाहतीत येतात. बिबट्या सहसा आपल्या नजरेच्या आतील प्राण्यांची शिकार करतो.११) बिबट्या पकडला तर त्याची जागा लगेच दुसरा बिबट्या घेतो, यामुळे नुसते बिबटे पकडून प्रश्न सुटत नाही.१२) वन्य जीव संरक्षण आदीनियम १९७२ च्या तरतुदीनुसार बिबट्याला पकडने, मारणे अथवा इजा करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी जबरदस्त शिक्षेची तरतूद आहे. तथापी, स्वसंरक्षण इतरांच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्याने मारणे गुन्हा ठरत नाही.१३) बिबट्या संदर्भ अफवा पसरु नये, किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.१४) बिबट्या नरभक्षक झाल्यास किंवा त्याचा उपद्रव मर्यादेच्या पलीकडे गेल्यास त्यास पकडण्याचे अथवा ठार मारण्याचे अधिकार कायद्याने राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना दिले आहेत. त्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये.१५) बिबट्या आढळल्यास किंवा त्याने जीवितहानी केल्यास त्या बाबतची माहिती तत्काळ वनविभागाला कळवावी. बिबट्याने केलेल्या जीवितहानीसाठी सानुग्रह अनुदान किंवा नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी वनविभागाकडे लेखी अर्ज करावा.१६) बिबट्याची समस्या सोडविण्यासाठी जबाबदारी वनविभाग प्रमाणे आपल्या सर्वांची आहे. यामुळे या कामात स्थानिक लोकांनी वनविभागाला आवश्यकतेनुरूप सहकार्य करावे.१७) अचानक बिबट्या दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करावा, त्यास त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे आणि याबाबत वनविभागाला संपर्क साधवा, हेल्पलाईन नंबर १९२६ डायल करावा.