निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पदरात काय पडणार ? अर्थमंत्री पवारांकडे लक्ष

By विकास राऊत | Published: January 10, 2024 03:23 PM2024-01-10T15:23:18+5:302024-01-10T15:24:01+5:30

सरत्या आर्थिक वर्षाचा खर्च ३० टक्क्यांवर

What will got to Marathwada in the face of elections? Pay attention to Finance Minister Pawar | निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पदरात काय पडणार ? अर्थमंत्री पवारांकडे लक्ष

निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पदरात काय पडणार ? अर्थमंत्री पवारांकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता फेब्रुवारी- मार्चमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू झाली असून १० जानेवारी रोजी विभागाचे २०२४-२५ साठी अर्थमंत्री अजित पवार ऑनलाइन बैठक घेणार आहेत. यात आठ जिल्ह्यांची नवीन मागणी व आजवरचा खर्च यावर चर्चा होऊन नवीन आराखड्यात आर्थिक तरतुदीचा निर्णय होईल.

यंदाचे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जाणार आहे, त्यामुळे सामान्यांना खुश करणाऱ्या याेजनांचा अंतर्भाव विभागीय वित्त व नियेाजनात असावा, यासाठी सत्ताधारी आमदार-खासदारांचा प्रयत्न असणार आहे.दरम्यान पुढे अफाट, मागे सपाट अशी परिस्थिती असून गेल्या वर्षी केलेल्या २,९४५ कोटी रुपयांच्या तरतुदीतून महसूल व भांडवली मिळून फक्त ३० टक्के म्हणजेच ८४५ कोटींचा खर्च विभागातील आठही जिल्ह्यांत झाला आहे. असे असताना नवीन आराखड्यासाठी विभागीय नियोजन बैठक होत आहे.

जानेवारी २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात आठ जिल्ह्यांनी त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर केले होते. तब्बल चार हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा यात समावेश होता. मागणीपैकी एक हजार ४५५ कोटींची कामे रद्द करीत दाेन हजार ९४५ कोटींची वार्षिक योजना विभागासाठी मंजूर केली होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा निधी आठ जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करणे गरजेचे आहे.

मागील आराखड्यांचा आकडा....
वर्ष २०२१-२२ साठी २,६०५ कोटींचा आराखडा होता.
वर्ष २०२२-२३ साठी २९४५ कोटींचा आराखडा होता.
वर्ष २०२३-२४ साठी ३५०० कोटींचा आराखडा असू शकतो.

जिल्हानिहाय मंजुरी व सरासरी खर्च
जिल्हा...........मंजूर निधी.........खर्च

छत्रपती संभाजीनगर- ५६०......१२५ कोटी
जालना - ३२५...........५० कोटी
परभणी - २९०..........४० कोटी
हिंगोली - २३५...........५० कोटी
बीड- ४१०..............७० कोटी
धाराशिव- ३४०..........१५० कोटी
लातूर- ३४०.............१५० कोटी
नांदेड- ४४५............२१० कोटी
एकूण २,९४५.............८४५ कोटी

लोकसभा आचारसंहिता मार्चमध्ये
लोकसभा निवडणुकीसाठी निर्धारित वेळेत आचारसंहिता लागेल, असे बोलले जात आहे. तत्पूर्वी होणाऱ्या नियोजन बैठकांमध्ये मतदार समोर ठेवून निर्णय हाेतील, असे बोलले जात आहे.

Web Title: What will got to Marathwada in the face of elections? Pay attention to Finance Minister Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.