- संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतात आता ‘सर्जा- राजा’च्या जागी ट्रॅक्टरची चाके वेगाने फिरत आहेत. जून आणि जुलै या अवघ्या दोनच महिन्यांत तब्बल ६४५ कृषी ट्रॅक्टरची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाली आहे.बळीराजा आता परंपरागत शेतीप्द्धतीा फाटा देत आहे. मठा प्रमाणावर शेतीचे झपाट्याने यांत्रिकीकरण सुरू असून, पूर्वमशागत, पेरणी, आंतरमशागत आणि मळणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. कमी कालावधीत काम उरकण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे.शिवाय बदलत्या काळात ग्रामीण भागात शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी होत आहे. याचा ताण शेतीतील कामावर पडतो. अनेक कामासाठी मानवी श्रम अपुरे पडतात. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर किती सोयीचा होऊ शकतो, याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.नांगरणीसह शेतीची अनेक कामे ट्रॅक्टरचा वापर करून काही कालावधीतच पूर्ण करणे शक्य होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे.भीतीचे वातावरण असल्याने यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे एप्रिल ते मे महिन्यादरम्यान एकाही ट्रॅक्टरची आरटीओ कार्यालयात नोंद झाली नाही; परंतु जून महिन्यापासून ट्रॅक्टरच्या विक्रीला सुरुवात झाली.जुलैअखेर तब्बल ६४५ कृषी ट्रॅक्टरची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाली. गतवर्षी याच ४ महिन्यांत ७४८ कृषी ट्रॅक्टरची नोंद झाली होती.त्यात यंदा किंचित घट झाली असली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावातही ट्रॅक्टरची विक्री होत असल्याचे दिसते. त्यातही कमर्शियल ट्रॅक्टरपेक्षा कृषी ट्रॅक्टरचीच विक्री सर्वाधिक होत आहे. एप्रिल ते जुलैदरम्यान यंदा केवळ ३ कमर्शियल ट्रॅक्टरची नोंद झाली.एक ट्रॅक्टर, कामे अनेकस्वत:च्या शेतात वापर करण्यासह इतरांच्या शेतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देऊन उत्पन्न मिळविण्यास प्राधान्य दिले जात आहे. वर्षभर इतर कामे करून उत्पन्न मिळविण्यावर भर दिला जात आहे.जिल्ह्यातील ट्रॅक्टरची परिस्थितीएप्रिल ते जुलै २०२० - ६४५एप्रिल ते जुलै २०१९ - ७४८जिल्ह्यातील एकूण संख्या - ३१ हजार ४६१
शेतात ‘सर्जा-राजा’च्या जागी ट्रॅक्टरची चाके गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 2:16 AM