लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महिलाओंके लिए अच्छे दिन कब आयेंगे, असा सवाल करीत अ. भा. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा फौजिया खान यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारच्या ध्येयधोरणांवर हल्लाबोल केला.राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज सकाळी राष्टÑवादी भवन, हडको एन-११ येथे बैठक झाली. या बैठकीतील निर्णय त्यांनी दुपारी एका पत्रपरिषदेत जाहीर केले.यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस टीपी पितांबरन मास्टरजी, राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस सीमा मलिक, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मेहराज पटेल आदींची उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, केरळ, तामिळनाडू, गुजरात, झारखंड या राज्यांतून व देशभरातून महिला प्रतिनिधींची या बैठकीस उपस्थिती होती. लवकरच घेतलेल्या निर्णयावर कृती कार्यक्रम राज्या-राज्यांतून लागू करण्यात येईल.१० टक्के तरतूद करा.....आम्ही महिला दिन साजरा करीत नव्हतो तर महिलांच्या संदर्भातील प्रश्नांची चिंता व्यक्त करीत होतो. सरकारने स्त्री-पुरुष जन्मदरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी दूर करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या १० टक्केतरतूद करावी, अशी आमची आग्रहाची मागणी असल्याचे फौजिया खान यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, यूपीए सरकारने जी तरतूद केली, ती तरतूद नरेंद्र मोदी सरकारने कमालीची घटविली आहे. केवळ शंभर कोटींची तरतूद अत्यंत तुटपुंजी आहे. दुसरीकडे वंशाला दिवा मुलगाच हवा, या भावनेतून स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण वाढतच आहे, समाज मुलीच्या जन्माचे स्वागत करू मागत नाही, ही खेदाची गोष्ट होय. शेवटी ‘ बेटी बचेगी तो दुनिया बचेगी’. हे सरकार बोलते एक आणि प्रत्यक्षात कृती वेगळीच करते.चंद्रकलाबाई सोळुंके यांचा गौरवजागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी आयोजित ‘राष्ट्रीय महिला काँग्रेस स्त्री जागर सोहळ्यात चंद्रकलाबाई सोळुंके यांना राष्ट्रवादी महिला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एकही दिवस शाळेत न जाता स्वत: अक्षर ओळख करून घेऊन त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी महिलांना प्रेरणा देणारे ‘नारी तू गंजू नकोस’ हे ९६ पानी पुस्तक लिहिले. राष्ट्रवादीचे नेते टी.पी. पितांबर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत आणि माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, शहराध्यक्षा मेहराज पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मिलन नायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
‘महिलाओंके लिए अच्छे दिन कब?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:17 AM
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महिलाओंके लिए अच्छे दिन कब आयेंगे, असा सवाल करीत अ. भा. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या ...
ठळक मुद्देफौजिया खान : महिलादिनी राष्ट्रवादी महिलांचे चिंतन; मोदी सरकारच्या ध्येयधोरणावर जोरदार टीकास्त्र