छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. कडक उन्हाळ्यात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडतो आहे. उमेदवारांसाठी नेत्यांच्या सभांची मांदियाळी सर्वत्र दिसत असून, पहिल्या टप्प्यात मतदानही झाले आहे. सात टप्प्यात देशभर मतदान होणार असून ते सर्व उन्हाळ्यात होणार आहे. १३ मे रोजी कडक उन्हाळ्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे पहिल्या टप्प्यातील आकड्यांवरून दिसते आहे. ऋतू, तापमान की मतदारांमध्ये असलेला निरुत्साह, याचा परिणाम होतो की नाही, याचा आजवरच्या निवडणुकींचा आलेख पाहिला तर काय लक्षात येते पाहू.
हिवाळ्यात झाले मतदान१९५२ ते १९६७ या चार निवडणुका, १९८० ते १९८९ या काळातील निवडणुका ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात म्हणजे हिवाळ्यामध्ये निवडणुकांसाठी मतदान झाले. ८ निवडणुकांसाठी उन्हाळ्यात मतदान झाले आहे.
वर्ष ............ महिना.............. कोणत्या ऋतूत निवडणुका ................... मतदान (टक्के)१९७२...... मार्च.....................उन्हाळा ...........................५२.६६१९७७..... मार्च .......... ........उन्हाळा ............................५६.१७१९८०.....जानेवारी...............हिवाळा .............................४५.०८१९८४......डिसेंबर ...............हिवाळा ............................५८.७८१९८९.....नोव्हेंबर ..............हिवाळा ..............................५९.९४१९९१....मे ....................उन्हाळा ...............................४८.६७१९९६......एप्रिल............उन्हाळा ................................५२.८९१९९८....फेब्रुवारी .............हिवाळा .............................६१.०४१९९९....ऑक्टोबर ............हिवाळा .............................६६.०६२००४....एप्रिल ................उन्हाळा ..............................५४.३०२००९.....एप्रिल ............उन्हाळा ............................५१.५६२०१४....एप्रिल ..............उन्हाळा ............................६१.८५२०१९....एप्रिल ...............उन्हाळा ....................६३.४८
दोनवेळा झाला मतदानावर परिणाम१९८०मध्ये हिवाळ्यात निवडणुका झाल्या तरीही मतदानाचा टक्का कमी होता. ४५.८० टक्के मतदान त्या साली झाले होते. १९९१ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ४८.६७ टक्के मतदान झाले होते. २००९ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ५१.५६ टक्के मतदान झाले होते.
मागच्या निवडणुकीत बऱ्यापैकी मतदान२०१९च्या निवडणुकीत जिल्ह्यात ६३.४८ टक्के मतदान झाले. आजवरच्या निवडणुकींपैकी हे मतदान बऱ्यापैकी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
यंदा मतदानादिवशी तापमान चाळिशी पार असणार१३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. वैशाखात मतदानाची तारीख असून, या काळात उन्हाचा कडाका जास्त असतो. तापमान चाळिशी पार असेल. त्यामुळे मतदानावर तापमानाचा परिणाम होतो की नाही, हे पाहावे लागेल.