छत्रपती संभाजीनगर : एकदा घरात धान्य खरेदी करून ठेवले की, वर्षभराची चिंता मिटते. उन्हाळ्यात खरेदीची पिढीजात परंपरा कायम ठेवत धान्य बाजारात वार्षिक धान्य खरेदीसाठी शहरवासीयांची लगबग सुरू झाली आहे.
शहरवासीयांना कोणत्या राज्यातील गव्हाची पोळी आवडते?छत्रपती संभाजीनगरात जिल्ह्यातील गव्हासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातील गहू विक्रीला आला आहे; मात्र यातील ७० टक्के गहू मध्य प्रदेशातील आहे. कारण, मध्य प्रदेशातील शरबती गव्हाची पोळी शहरवासीयांना आवडते.
शरबती गहू खरेदी करणाऱ्यांना आनंदाची बातमीमध्य प्रदेशात शरबती गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती; तसेच अन्य जातीच्या गव्हाच्या तुलनेत शरबती गहू बाजारात उशिरा येतो. यामुळे या गव्हाला अवकाळी पावसाचा फटका बसला नाही. या गव्हाचा रंग व गुणवत्ता चांगली आहे. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत ३०० ते ४०० रुपयांनी यंदा गहू स्वस्त मिळत आहे. सध्या शरबती गहू ३५०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे.
बासमती भाताची पर्वणीइराण व अन्य देशांनी भारताकडून बासमती तांदूळ खरेदी करणे कमी करून टाकले आहे. यामुळे बासमतीच्या निर्यातीवर मोठा परिणाम जाणवत आहे. परिणामी, किलोमागे ८ ते १० रुपयांनी भाव कमी झाले आहेत. ५० ते ९० रुपये किलोदरम्यान विकल्या जात आहे. यामुळे बासमतीचा भात खाणाऱ्या खवय्यांना यंदा पर्वणीचा काळ ठरणार आहे. यंदा पेरा कमी राहिल्याने २० टक्क्यांनी अन्य तांदूळ महागले आहेत.
तूर, मूग, उडीद डाळ सव्वाशे पारवार्षिक धान्य खरेदीत सर्व प्रकारच्या डाळींची खरेदी केली जाते. तूर, उडीद व मुगाचे उत्पादन कमी असल्याने भाव सव्वाशेच्या पुढे जाऊन पोहोचले आहेत; मात्र हरभरा डाळ, मसूर डाळ व मठ डाळीचे भाव शंभरच्या आतच आहेत.
वर्षातून एकदाच का खरेदी करतात धान्य?उन्हाळ्यात नवीन सर्वप्रकारचे गहू, ज्वारी, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ बाजारात दाखल होतात. हंगामात चहूबाजूंनी आवक होते. त्यामुळे हंगामात धान्याचे भाव कमी असतात. नंतर भाव वाढतात. घरात धान्य असले तर, घर वर्षभर भरलेले असते. हंगामानंतर कितीही भाव वाढले तरी वार्षिक धान्य खरेदी करणारे फायदेशीर राहतात.
धान्याला कडक उन्हात का ठेवतात?उन्हाळ्यात नवीन गहू, ज्वारी, हरभरा डाळ यांच्यात ओलसरपणा असतो. खरेदी करून, तसेच कोठीत ठेवले तर, त्यांना कीड लागते. यासाठी कडक उन्हात एक ते दोन दिवस गच्चीवर ठेवले जाते. जेणेकरून त्यातील ओलसरपणा निघून गेला की, नंतर वर्षभर कीड लागत नाही.- नीलेश सोमाणी, धान्य होलसेलर
धान्याचे होलसेल भावगहू किंमत (प्रतिकिलो)महाराष्ट्रातील गहू २८- ३४ रू.मध्य प्रदेश गहू- २९-३७ रु.राजस्थान गहू ३१-३३ रु.गुजरात गहू ३१- ३५ रु.उत्तर प्रदेश गहू २९-३२ रु.
डाळी किंमत (प्रतिकिलो)तूर डाळ १३५-१४० रु.मूग डाळ ११०-११५ रु.उडीद डाळ ११७-१२० रु.हरभरा डाळ ७०-७५ रु.मसूर डाळ ७८-८० रु.मठ डाळ ८८-९० रु.
तांदूळ किंमत (प्रतिकिलो)कोलम ६०-६३ रुकाली मूंछ ६३-६८ रु.अंबेमोहर ५५- ६० रु.इंद्रायणी ५७-६५ रु.सोना स्टिम ४३-४७ रु.