शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

शेतीच्या बांधापर्यंत कधी जाईल कार; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ पाणंद रस्ते पूर्ण

By विजय सरवदे | Published: July 24, 2024 8:08 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत

छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या बांधापर्यंत वाहन घेऊन जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा शेतमालाची वाहतूक तसेच शेती कसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री घेऊन जाणेही शक्य होत नाही. अलीकडे शासनाने गावागावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ अंमलात आणली. परंतु, या रस्त्याच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ एवढेच पाणंद रस्ते पूर्ण होऊ शकले.

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली आहेत. तरीदेखील आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढत शेतावर जावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्यासाठी शासनाने रस्त्यासाठी भरपूर निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, मनरेगा अंतर्गत रस्ते कामांऐवजी मजुरांचा कल हा गुरांचे गोठे, घरकुले, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी, अशा वैयक्तिक स्वरूपाच्या कामांकडेच जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्त्याच्या योजनेला फारसी गती मिळत नसल्याचे चित्र आहे.

काय आहे पाणंद रस्ते योजनायांत्रिकीकरणामुळे शेतीत पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत होतात. अशा यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यातही पाणंद रस्ते चांगले असणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पाणंद रस्ते योजना अंमलात आणली.

जिल्ह्यात ३४९ रस्ते पूर्ण; १४३८ कामे प्रगतिपथावरजिल्ह्यात ८७० ग्रामपंचायतींच्या हद्दीत २४५७ पाणंद रस्त्यांची कामे मंजूर आहेत. यापैकी १७८० कामे ग्रामपंचायती, तर तहसील कार्यालयामार्फत ७६९ कामे केली जात आहेत. यापैकी जिल्हा परिषदेने १६१३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून, आतापर्यंत ३४९ रस्ते पूर्ण झाले, तर १४३८ कामे प्रगतिपथावर आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी काय सांगतेतालुका- पाणंद रस्ते पूर्ण- प्रगतिपथावरछत्रपती संभाजीनगर- २९- १५५फुलंब्री- ०८- १०५सिल्लोड- २५- ११०सोयगाव- ०९- १३कन्नड- ५०-२६४खुलताबाद- ०५- १९गंगापूर- ३८- १५३वैजापूर- ४२- १९७पैठण- १४३- ४२२

अडीच हजार शेतरस्त्यांचे भाग्य उजळणारशेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर आहेत. ग्रामपंचायत आणि तहसील या दोन यंत्रणांनी मनावर घेतले तर पावसाळ्यानंतर पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. दरम्यान, या मंजूर रस्त्यांचे भाग्य कधी उजळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद