शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

अखंड वीजपुरवठा कधी होणार ? महावितरणचा कारभार कधी सुधारणार?

By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2024 3:34 PM

गारखेडा परिसरात आपत्कालीन भारनियमन; तापमानासह अवकाळीचा दणका

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या तापमानामुळे व त्यामुळे वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे गारखेडा परिसरातील काही वीजवाहिन्यांवर महावितरणला नाईलाजास्तव आपत्कालीन भारनियमन सुरू करावे लागले आहे.

एन-४ येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे त्यावरील ११ केव्ही गारखेडा वाहिनीचा भार ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रावर घेण्यात आलेला आहे. परंतु मागील ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेमुळे अचानक वीज मागणी वाढली आहे. त्यामुळे ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रामधील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत आहे. परिणामी काही वीजवाहिन्यांवर रात्री १० ते २ वाजेपर्यंत कुठल्याही वेळेस सुमारे २ तास आपत्कालीन भारनियमन होण्याची शक्यता आहे.

यात ११ केव्ही गजानननगर वाहिनीवरील सारंग हाउसिंग सोसायटी, नंदिग्राम नंदीग्राम सोसायटी, कडा कार्यालय, वेद मंत्रा, चैतन्य हाउसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, विशालनगर, अलंकार सोसायटी, त्रिमूर्ती चौक, शांतिनिकेतन कॉलनी, उत्तमनगर, भानुदासनगर, विष्णुनगर, अरिहंतनगर, मित्रनगर, ११ केव्ही सुहास कॉलनी वाहिनी व ११ केव्ही गारखेडा वाहिनीवरील यश मुथियान, नाथ प्रांगण, साहस सोसायटी, आदिनाथनगर, भांडार चौक, के पॉन्ड हॉस्पिटल, प्रेरणानगर, विजय चौक, स्वप्ननगरी, माणिकनगर, हनुमाननगर, पुंडलिकनगर, हुसेन कॉलनी, छत्रपतीनगर, ११ केव्ही मुथा वाहिनीवरील मेहरनगर, गारखेडा गाव, उल्कानगरी, सहयोगनगर, हिरण्यनगर, हनुमाननगर, शास्त्रीनगर, भगवती कॉलनी, अशोकनगर, हेडगेवार हॉस्पिटल, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आदी भागांत वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. एन-४ उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर गुरुवारी बसविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व समस्या मार्गी लागतील.

गुरुवारी काही भागांत वीज बंद..दरम्यान, पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामासाठी एन-४ उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या काही वसाहतींचा वीजपुरवठा गुरुवारी (१८ एप्रिल) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यात मालाणी डीटीसी, मायानगर, सिडको एन-२, एन-३, अजयदीप काम्प्लेक्स, मानसी हॉटेल, गुरुसाहनीनगर, तिरुपती पार्क, चौधरी डीटीसी, एन-४, पारिजातनगर, विवेकानंदनगर, विश्रांतीनगर, उच्च न्यायालय, गारखेडा परिसराचा समावेश आहे, ग्राहकांनी सहकार्य अपेक्षित आहे, असे महावितरणने कळवले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज