लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात सर्वच क्षेत्रांत विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: शेतक-यांचे अनेक प्रश्न जटिल होत चालले आहेत. सरकारच्या उदासीन धोरणांमुळे रोज शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. या सर्व प्रश्नांचा जाब नाकर्त्या राज्य सरकारला विचारण्यात येणार आहे. यासाठी ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणा-या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा प्रचंड मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या चालू आहे, अशी माहिती आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.या मोर्चाच्या पूर्वतयारीची मराठवाडा विभागाची बैठक आज चव्हाण यांनी औरंगाबादेत घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. त्यांनी सांगितले की, आज राज्यात अनेक प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्याचा जाब आम्ही सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही. जाब विचारण्यासाठी काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या तयारीच्या बैठका सध्या सुरू आहेत. काल मुंबईत उत्तर महाराष्टÑाची बैठक झाली. लवकरच विदर्भ व पश्चिम महाराष्टÑाच्या बैठका होतील.सरकारकडून अनेक प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. कुठे गेली ३४ हजार कोटींची व ८९ लाख शेतक-यांची कर्जमाफी? केवळ तारीख पे तारीख व टाळाटाळ सुरू आहे.सोयाबीन व कापसाची खरेदी आॅनलाइन सुरू करून शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही आॅनलाइन प्रक्रिया बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. हमी भाव कायदा कुठे आहे. तो नसल्यामुळे शेतक-यांचे दुहेरी नुकसान होत आहे.शेतकºयांच्या रोज आत्महत्या होत असतानाही सरकार संवेदनशून्य पद्धतीने वागत आहे. राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या तारखा जाहीर होत आहेत; पण खड्डे बुजताना दिसत नाहीत, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.
शेतकरी कर्जमाफी गेली कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:41 AM