औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. दरम्यान, आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून यासंदर्भात मार्गदर्शन प्राप्त होताच येत्या आठ दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.जि. प. सदस्य किशोर पवार, उपाध्यक्ष केशव तायडे पाटील, सुरेश सोनवणे, विजय चव्हाण, मधुकर वालतुरे, एल. जी. गायकवाड, रमेश पवार, अविनाश गलांडे, रमेश गायकवाड या सदस्यांनी आरोग्य विभागात पुरवठादारास ९ लाखांचे ९० लाख देण्यात आले. अलीकडे २ लाख ३० हजार रुपयांचे देणे असताना २३ लाख रुपये हडप केले. या प्रकाराने आणखी किती लाखांचा अपहार आरोग्य विभागाला अपेक्षित आहे. यासंदर्भात मुंबई येथील आरोग्य विभागाच्या पथकाने सविस्तर चौकशी केल्यानंतरही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल का केला नाही. आरोग्य विभाग निधी लाटणाºया कर्मचाºयांना पाठीशी घालत असल्याचा या सदस्यांनी आरोप केला.सदस्यांच्या आरोपाचे खंडण करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सभागृहासमोर स्पष्टीकरण दिले की, ज्या कर्मचाºयांनी ही चूक केली होती, त्या कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ‘एनएचएम’ मध्ये कंत्राटी अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार आरोग्य आयुक्तांना आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आल्याशिवाय पोलिसात गुन्हे दाखल करता येणार नाहीत. तेव्हा उपाध्यक्ष केशव तायडे व किशोर पवार म्हणाले की, जि. प. मध्ये अन्य विभागातील कर्मचाºयांकडून एखादी चूक झाली, तर लगेच त्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातात, मग आरोग्य विभागात लाखो रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही त्या कर्मचाºयास केवळ सेवेतून बडतर्फ केले जाते. मग, अपहार केलेल्या रकमेची भरपाई कोण देणार. तेव्हा डॉ. गिते म्हणाले की, ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली आहे. यावरही सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी दोन दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली.चौकट .....आठ दिवसांत केली जाईल दोषींविरुद्ध पोलीस कारवाईमुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सभागृहाला सांगितले की, डॉ. गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना या घटनेविषयी मुंबईला पाठविण्यात आले. तेथे आरोग्य विभागाच्या आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर चौकशी पथक जिल्हा परिषदेत पाठविले. अधिकाºयांच्या चौकशी पथकाने आरोग्य विभागात तब्बल १५ ते २० दिवस तळ ठोकून ‘एनएचएम’च्या प्राप्त सर्व निधीची पडताळणी करून ते पथक मुंबईला रवाना झाले. आरोग्य आयुक्तांसोबत चर्चा करून येत्या आठ दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील.------------
निधी लाटणाऱ्यांवर गुन्हे का नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:23 PM
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला.
ठळक मुद्देजि.प. सर्वसाधारण सभेत सवाल : जिल्हा आरोग्य अधिकाºयांवर भडीमार