शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कोणता मच्छर चावला? ओळखण्यासाठी मॉड्यूल विकसित, प्राध्यापिकेचा पेटंटसाठी प्रस्ताव दाखल

By राम शिनगारे | Published: November 17, 2023 1:52 PM

डासांची ओळख होण्यासाठी विकसित केलेल्या मॉड्यूलमध्ये १० वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर : ‘रोबोट’ सिनेमात नायिकेस चावलेला नेमका डास यंत्रमानव ‘चिट्टी’ (रजनीकांत) पकडून आणतो. काहीसे तसेच तंत्रज्ञान आता खरोखर विकसित होत आहे. मच्छरजन्य रोगांपासून जगभरात दरवर्षी ७ लाखांपेक्षा अधिक मृत्यू होतात. माणसांचा चावा घेणारे मच्छर नेमके कोणत्या प्रजातीचे असतात, त्याचा मात्र थांगपत्ता लागत नाही. मच्छर चावा घेऊन जातो आणि नागरिकांना संसर्गजन्य रोग होतो. हे चावणारे मच्छर नेमके कोणत्या प्रजातीचे आहेत, त्याचा शोध घेणारे मॉड्यूल देवगिरी महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेने विकसित केले आहे. या संशोधनाचे पेटंट प्रकाशित झाले असून, कन्फर्मेशनची प्रक्रिया सुरू आहे.

देवगिरी महाविद्यालयातील संगणक विज्ञान आणि आयटी विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या डॉ. आयेशा अनम इर्शाद सिद्दीकी यांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी संशोधन केलेल्या ‘डेव्हलपमेंट ऑफ मॉस्किटो सेन्सर ट्रॅप‘ या विषयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. जाहीर केली. पिवळा ताप, झिका आणि डेंग्यू ही एडिस इजिप्ती डासांद्वारे मानवांमध्ये प्रसारित होणाऱ्या अर्बोव्हायरसची काही उदाहरणे आहेत. मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृती गर्भधारणेदरम्यान झिका विषाणू संसर्गामुळे होतात. मानवी डोळ्याद्वारे डासांच्या प्रजातींमध्ये फरक करणे, हे आव्हानात्मक काम आहे. डेंग्यू, झिका विषाणू आणि मलेरिया यांसारख्या रोगांसाठी जबाबदार असलेल्या डासांच्या प्रजाती ओळखण्यासाठी सूक्ष्मदर्शक आणि कीटकशास्त्रज्ञ आवश्यक आहेत. डासांच्या संवेदक सापळ्यांचा वापर करून त्यांना ओळखता येईल, असे मॉड्यूल डॉ. सिद्दीकी यांनी बनवले.

वेगवेगळ्या उपकरणांचा वापरडासांची ओळख होण्यासाठी विकसित केलेल्या मॉड्यूलमध्ये १० वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात. तयार केलेला मच्छर संवेदक सापळा डासांच्या प्रजाती ओळखण्यात सक्षम आहे. त्यासाठी कॅमेरा, मायक्रो लेन्सचा सेन्सरचा वापर करण्यात आला. सध्या बाजारात डासांची ओळख होईल, असे एकही उपकरण उपलब्ध नाही. या संशोधनामुळे डास ओळखण्याच्या उपकरणाची निर्मिती होऊ शकणार आहे.

पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखलपीएच.डी. संशोधनात तयार केलेल्या मॉड्यूलचा उपयोग कीटकशास्त्रज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी, वेक्टर कंट्रोल एजन्सीसाठी मदतीसाठी होणार आहे. या अभिनव अशा संशोधनाला पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानुसार हे संशोधन पेटंट कार्यालयाने प्रकाशित केले असून, कन्फर्मेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.- डॉ. आयेशा सिद्दीकी, संशोधक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणdengueडेंग्यू