औरंगाबाद: परळी कोर्टात हजेरी लावल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, इंधन भरण्यासाठी हेलिकॉप्टर औरंगाबादमध्ये थांबले. यावेळी राज ठाकरे पळशी येथील एका रिसॉर्टवर थांबले असता तिथे शालेय सहल आली होती. सहलीतील विद्यार्थी, शिक्षकांसोबत संवाद साधत राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले.
सन २००८ सालच्या एका प्रकरणात परळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. यासाठी राज ठाकरे स्वतः परळी न्यायालयात हजर झाले. त्यामुळे ५०० रुपये दंड आकारून त्यांच्या विरोधातील वॉरंट न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर राज ठाकरे थेट मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, इंधन भरण्यासाठी हेलिकॉप्टर औरंगाबाद येथे थांबले. रिसॉर्टवरून ते पुन्हा मुंबईकडे निघाले असतानाच तिथे एका शाळेची सहल त्याठिकाणी आलेली होती. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना पाहून आनंद व्यक्त केला. चिमुकल्यांचा उत्साह पाहून राज ठाकरे देखील त्यांच्यात सामील झाले. विद्यार्थी, शिक्षकांसोबत संवाद साधत राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. त्यानंतर ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.
अजामीनपात्र अटक वॉरंट रद्दमनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट परळी कोर्टाने आज रद्द केले. सन २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना कोर्टाने अटक वॉरंट बजावले होते. आज सकाळी राज ठाकरे स्वतः कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाने पाचशे रुपयांचा दंड बजावून त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती अॅड. अर्चित साखळकर यांनी दिली.