शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

‘मॅडम’साठी १० हजार तर स्वत:साठी दोन हजार घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:44 AM

गुटखा विक्रेत्यांकडून लाच प्रकरणात दौलताबादच्या महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा

औरंगाबाद : दौलताबाद पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या महिला पोलीस निरीक्षकाने गुटखा विक्रेत्याकडे दरमहा २५ हजार रुपये हप्त्याची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली. रजेवर असलेल्या या पी.आय. मॅडमसाठी १० हजार रुपये आणि स्वत:चे २ हजार अशी एकूण १२ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी दौलताबादेत रंगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ आणि पोलीस हवालदार रणजीत सहदेव शिरसाट अशी आरोपींची नावे आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार तरुणाने दोन महिन्यांपूर्वी चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू केली. हे दौलताबाद पोलिसांना समजले. यानंतर एका हवालदाराने गुटखा विक्रेत्याला ठाण्यात बोलावून घेतले होते आणि त्याची भेट मिसाळबाईंशी करून दिली होती. तेव्हा त्यांनी त्याला दोन दिवसांनंतर ये, असे सांगितले. त्यांचा उद्देश समजल्याने त्याने एसीबी कार्यालयात तक्रार नोंदविली. 

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्डरसह त्याला २४ मार्च रोजी दौलताबाद ठाण्यात पाठविले. तेव्हा हवालदार रणजीत त्याला भेटला आणि त्याला घेऊन मिसाळ यांच्या केबिनमध्ये गेला. यावेळी तक्रारदारासोबत एसीबीचा पंचही होता. मिसाळ यांनी हा कोण आहे, असे विचारले तेव्हा तो गुटख्याचा होलसेल डीलर असल्याचे तरुणाने सांगितले. मिसाळ यांच्या सांगण्यावरून रणजीतने दोघांची झडती घेतली. मात्र त्यांच्याजवळील रेकॉर्डर त्याच्या हाती लागले नाही. यावेळी दरमहा २५ हजार रु. हप्ता आणि एक केस केली जाईल, असे बजावले. तेव्हा नव्यानेच व्यवसाय सुरू केल्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. तडजोडीअंती त्याने दहा हजार हप्ता घेण्याची तयारी दर्शविली.

हवालदार म्हणाला, वेगळे दोन हजार माझेकेबिनमधून बाहेर आल्यानंतर सिरसाट म्हणाला की, आम्ही गरीब आहोत, वेगळे दोन हजार माझे असतील. दोन-तीन दिवसांत आणून देतो, असे सांगून तक्रारदार ठाण्यातून बाहेर पडला.

आजी वारल्यामुळे गावाला गेल्याने लांबला ट्रॅपयानंतर चार दिवसांत तक्रारदाराची आजी वारल्याने ते गावी गेले. दरम्यान, सिरसाटने त्यांच्याकडे तगादा लावला. गुरुवारी मॅडम रजेवर आहेत. दोघांचे मिळून १२ हजार रुपये घेऊन सिरसाटने त्यास बोलावले. लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक एन.एच. क्षीरसागर, हवालदार राजेंद्र जोशी, प्रकाश घुगरे, चांगदेव बागूल आणि आशा कुंटे यांनी केली. हवालदारास अटक केली असून रजेवरील ‘मॅडम’चा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद